Dr. Aditya Patil & Dr. Vijay Khairnar esakal
नाशिक

Nashik News : डॉक्टर मुलगा, जावई यांच्यावर एकाच दिवशी अंत्यसंस्कार! हृदय पिळवटून टाकणारी घटना

Latest Nashik News : येथील शिवाजी चौकातील हिरा हॉस्पिटलचे संचालक, भाजपचे ज्येष्ठ नेते, सेवाभावी डॉ. सी. एन. पाटील, जि.प.च्या सदस्या सुनीता पाटील यांना एकुलता एक अविवाहित डॉक्टर मुलगा आणि डॉक्टर जावई यांच्यावर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना गुरुवारी (ता. ३) घडल्याने शोककळा पसरली आहे.

प्रशांत बैरागी

नामपूर : जीवन क्षणभंगुर आहे. काळाच्या पोटात काय दडले आहे, हे कुणीही ओळखू शकले नाही. नियती किती क्रूर असते, याची प्रचिती पहिल्यांदा नामपूरकरांना आली. येथील शिवाजी चौकातील हिरा हॉस्पिटलचे संचालक, भाजपचे ज्येष्ठ नेते, सेवाभावी डॉ. सी. एन. पाटील, जि.प.च्या सदस्या सुनीता पाटील यांना एकुलता एक अविवाहित डॉक्टर मुलगा आणि डॉक्टर जावई यांच्यावर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना गुरुवारी (ता. ३) घडल्याने शोककळा पसरली आहे. (Doctor son son in law cremated on same day at nampur)

येथील शिवाजी चौकातील हसतमुख, मितभाषी डॉ. आदित्य चिंतामण पाटील याने लातूर वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पदवी घेतल्यानंतर तो वडिलांच्या व्यवसायात मदत करत असे. साधारण वीस दिवसांपूर्वी त्याला काविळची लागण झाल्याने आधी मालेगावला त्यानंतर नाशिकला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. रात्री हजारो जनसमुदायाच्या साक्षीने मोसम तीरावरील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले.

दुसऱ्या घटनेत डॉ. सी. एन. पाटील यांचे जावई, कोटबेल (ता. बागलाण) येथील निवृत्त वन अधिकारी वामनराव खैरनार यांचे चिरंजीव डॉ. विजय वामनराव खैरनार यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाल्याने कुपखेडा येथील मूळ रहिवासी असलेल्या पाटील आणि खैरनार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. (latest marathi news)

कोरोनात डॉ. सी. एन. पाटील यांनी जिवावर उदार होऊन नागरिकांची सेवा केली. गोरगरीब रुग्णांच्या हक्काचा दवाखाना म्हणून डॉ. पाटील यांची ख्याती आहे. गेल्या ३५ वर्षांच्या कार्यकाळात शहरासह मोसम खोऱ्यातील हजारो रुग्णांना त्यांनी संजीवनी दिली. परंतु डॉक्टर मुलगा आणि जावई यांची मृत्यूची अयशस्वी झुंज पाटील-खैरनार कुटुंबीयांवर घाव करणारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : नवले पुलावर चारचाकीने घेतला पेट, पुण्याकडे येणारी वाहतूक तात्पुरती बंद, नेमकी कशी लागली आग?

GT vs PBKS: पहिल्या बॉलवर कॅच सुटला अन् नंतरच्या दोन चेंडूत दोन विकेट्स पडल्या, सिराजच्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं? पाहा Video

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाचा निकाल सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

SCROLL FOR NEXT