Dr. Tejas Garge Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Tejas Garge Bribe Case : डॉ. तेजस गर्गेंना उच्च न्यायालयाचा दिलासा; 12 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

Tejas Garge Bribe Case : दीड लाखाच्या लाचप्रकरणी गुन्हा दाखल असलेले पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे तत्कालीन संचालक संशयित डॉ. तेजस गर्गे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Tejas Garge Bribe Case : दीड लाखाच्या लाचप्रकरणी गुन्हा दाखल असलेले पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे तत्कालीन संचालक संशयित डॉ. तेजस गर्गे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. गेल्या तीन आठवड्यांपासून पसार असलेले डॉ. गर्गे यांना उच्च न्यायालयाने १२ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केल्याने तूर्तास त्यांच्यावरील अटकेची कारवाई टळली आहे. एका उद्योजकाच्या फिर्यादीनुसार, पेठ रोडवरील रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी कंपनी सुरू करण्यासाठी त्यांनी पुरातत्त्व विभागाकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते. ( Dr High Court relief to Tejas Garge granted interim bail till June 12 )

त्यासाठी पुरातत्त्वच्या सहायक संचालक आरती मृणाल आळे (४१), संचालक तेजस गर्गे यांच्याविरुद्ध दीड लाखाच्या लाचप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने डॉ. गर्गे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर उच्च न्यायालयाने बारा जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केल्याने गर्गे यांच्यावरील अटकेची कारवाई टळली आहे.

तपशिलाची प्रतीक्षा

डॉ. गर्गेंच्या मुंबईतील सील केलेल्या घराची झडती गेल्या आठवड्यात त्यांच्या पत्नी विशाखा यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती सुमारे तीन लाखांची रोकड लागली होती. तर, बँक खात्यात २० लाख रुपयांचा तपशिल मिळाला. तर काही बँक खात्यातील तपशील अद्याप मिळाला नसून, त्याची पथकाला प्रतीक्षा आहे.

तपासाला मिळेना गती

रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी कंपनीसाठी ना-हरकत प्रमाणपत्रासाठी दीड लाखांची लाच सहायक संचालक आरती आळे यांनी मागितली. ७ मे रोजी लाचेची रक्कम स्वीकारली होती. लाचेच्या हिश्यासंदर्भात आळे यांचे डॉ. गर्गे यांच्याशी बोलणे झाल्याचे तपासातून समोर आले. याप्रकरणी आळे यांना अटक न करता चौकशी सुरू आहे.

तर डॉ. गर्गे हे गुन्हा दाखल झाल्यापासून पसार आहेत. जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला तर, उच्च न्यायालयाने अंतरिम मंजूर केला आहे. परंतु या साऱ्या घडामोडीत तीन आठवड्यांचा कालावधी गेल्याने तपासाला गतीच मिळू शकलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT