Dr. Uday Narkar. esakal
नाशिक

Nashik News : रशियन राज्यक्रांतीचे नायक लेनिन एकाधिकार शाही विरोधात : डॉ. उदय नारकर

Nashik : रशियन राज्यक्रांतीचे नायक व्लादिमीर लेनिन धर्म व एकाधिकारशाही विरोधात उभा राहिले. ते सत्ताकांक्षी, क्रूरकर्मा होते हा मोठा गैरसमज होता.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : रशियन राज्यक्रांतीचे नायक व्लादिमीर लेनिन धर्म व एकाधिकारशाही विरोधात उभा राहिले. ते सत्ताकांक्षी, क्रूरकर्मा होते हा मोठा गैरसमज होता. केवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला बदनाम करण्यासाठी गैरसमज पसरविण्यात आल्याचा दावा माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे ‘मानवमुक्ती लढ्याचा ध्रुवतारा : कॉम्रेड लेनिन’ या विषयावर डॉ. नारकर यांनी बुधवारी (ता.२०) १२३ वे पुष्प गुंफले. (nashik Dr Uday Narkar statement of Lenin Hero of Russian Revolution Against Dictatorship marathi news)

अखिल भारतीय किसान सभेकडून आयोजित हे व्याख्यान सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झाले. यावेळी सुनील मालुसरे, शरद पटवा उपस्थित होते. किसान सभेचे माजी अध्यक्ष किसन गुजर यांनी किसान सभा संस्थेचा परिचय करून दिला. तर वक्त्यांचा परिचय सचिन मालेगावकर यांनी करून दिला.

यावेळी डॉ. नारकर यांनी लेनिनचे व्यक्तिमत्त्व, जीवनपट व रशियन राज्यक्रांतीचा इतिहास यावेळी मांडला. डॉ. नारकर म्हणाले की, लेनिन यांच्या जन्मापूर्वी रशियात जुलुमशाही होती. यात अनेक बंडखोर नेते उदयास आले. त्यांनी साहित्य निर्माण केले. या बंडखोरीचा लेनिन यांच्या कुटुंबावर परिणाम झाला होता.(latest marathi news)

देशात सामाजिक निराशा निर्माण झाली की, लोक सुखवादाकडे झुकतात. वैयक्तिक सुखाला व अध्यात्माला महत्त्व देऊ लागतात. रशियात १९०७ मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर लेनिन यांनी दहा वर्षे आधीच रशियन क्रांतीचा अंदाज वर्तवला. त्या दृष्टीने ते द्रष्टे नेते व विचारवंत होते. त्यांचे वाचन अफाट होते. त्यांच्यावर चेकॉव्ह, टॉलस्टॉय या लेखकांचा प्रभाव होता. टॉलस्टॉयची ‘अॅना करेनिना’ ही कादंबरी लेनिन यांनी शंभर वेळा वाचली होती.

आज राजकीय नेत्यांच्या हातात पुस्तक दिसत नाही. फोटोंची आवड असणाऱ्यांनी किमान रामायण, महाभारत वाचतानाचे फोटो तरी प्रसिद्ध करावेत. वकील असलेल्या लेनिन यांनी आयुष्यात ५३ खटले लढविले व ते सर्व जिंकले. पोट भरण्यासाठी चोरी करणाऱ्या गोरगरिबांना ते तुरुंगात जाण्यापासून वाचवत.

लेनिन हे नाटक, संगीताचे भोक्ते होते; पण क्रांती हेच त्यांचे जीवनध्येय होते. आपले मत ते अत्यंत मनस्वीपणे मांडत असल्याने ते लोकांच्या काळजाला भिडत होते. त्यामुळे लोक त्यांचे अनुयायी झाले, असे त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. मिलिंद वाघ यांनी प्रास्ताविक केले. श्यामला चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. आदित्य पवार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT