drainage line sakal
नाशिक

नाशिक : पोटाची खळगी भरण्यासाठी जिवावर उदार स्वच्छता कामगार

कर्मचाऱ्यांना जिवावर उदार होऊन कामे करावी लागतात. याचे बोलके चित्र रोकडोबा तालीम परिसरात बघावयास मिळाले.

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : ड्रेनेज चेंबरची स्वच्छता करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. महापालिका किंवा ठेकेदार यांनी कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, प्रत्यक्षात मात्र असे होत नाही. कर्मचाऱ्यांना जिवावर उदार होऊन कामे करावी लागतात. याचे बोलके चित्र रोकडोबा तालीम परिसरात बघावयास मिळाले.

बंद ड्रेनेज चेंबरमध्ये विषारी गॅस जमा होत असतो. त्यामुळे जीव जाण्याचीदेखील शक्यता असते. शहरात अशा अनेक घटना घडल्या आहे. आनंदवली, सीबीएस, मेहरधाम, वडाळा रोड अशा विविध भागात चेंबरमध्ये काम करत असताना महापालिका, तसेच खासगी कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी महापालिका आणि खासगी ठेकेदार यांच्याकडून कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही, अशाच प्रकारचे काम गाडगे महाराज पुलास लागून असलेल्या रोकडोबा तालीम परिसरात होताना दिसून आले.

काही कर्मचारी चेंबरच्या वाहत्या पाण्यात उतरून स्वच्छता करताना आढळून आले. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची काळजी न घेता थेट पाण्यात बुडून त्यांच्याकडून चेंबरमधील कचरा काढण्याचे काम सुरू होते. प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, पिशव्या, गाळ अशा विविध प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडून काढण्यात आला. नदीकाठचे चेंबर असल्याने जरी त्यात नदीचे पाणी असले, तरी इतर ड्रेनेज पाणीदेखील त्या चेंबरमध्ये येत असल्याने त्यातील पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित, विषारी झालेले असते.

असे असताना ते कर्मचारी पाण्यात बुडून आतील कचरा काढत असल्याने दुर्गंधीयुक्त पाणी त्यांच्या नाकातोंडात जात होते. दुर्दैवाने कुठलीही अनुचित घटना घडली असती. तर यास कोण जबाबदार राहिले असते, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले. खरेतर दुर्गंधीयुक्त पाणी भरलेले चेंबरचे सफाई यंत्राद्वारे स्वच्छता होणे आवश्यक आहे. जेणेकरून कुठलीही जीवितहानी होणार नाही. महापालिका असो किंवा ठेकेदार त्यांच्याकडून यंत्र वापरावर दुर्लक्ष करत रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून त्यांची स्वच्छता करून घेतली जाते. त्यांचा जीव धोक्यात घातला जातो. अशा प्रकारांना आळा बसणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप नगरसेवकांच्या बसचा अपघात, नियंत्रण सुटलं अन् हॉटेलच्या भिंतीला धडकली

Abhijeet Dipke: मोठी बातमी! ३ सेकंदात ४ थप्पड... कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, काय घडलं?

MNGL Fraud : एमएनजीएल गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने महिला वकिलाची ४.९८ लाखांची ऑनलाइन फसवणूक

Latest Marathi News Live Update : जोपर्यंत मी राहील तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहील- वाजे

MNGL Fraud : एमएनजीएलच्या नावाने व्हॉट्सॲप एपीके फाईल; १३ रुपयांच्या बहाण्याने क्रेडिट कार्डवरून ३.६४ लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT