Nashik ZP News  esakal
नाशिक

Nashik ZP News : स्वीप, कॉफी टेबल बुक तयारीत दुष्काळाचा विसर; जिल्हा परिषदेकडून दुष्काळ आढावा बैठक होईना

Nashik ZP News : ग्रामीण भागातील लोकांना सोयी-सुविधा पुरविणे व त्यांच्या समस्या सोडविण्याची मुख्य जबाबदारी जिल्हा परिषद यंत्रणेवर आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : ग्रामीण भागातील लोकांना सोयी-सुविधा पुरविणे व त्यांच्या समस्या सोडविण्याची मुख्य जबाबदारी जिल्हा परिषद यंत्रणेवर आहे. जिल्ह्यात यावर्षी अभूतपूर्व दुष्काळाची स्थिती असून, तब्बल ८०० गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. (Nashik Drought review meeting is not being conducted by Zilla Parishad)

जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर असून, या परिस्थितीत ग्रामीण भागात जाऊन त्यांच्या समस्या समजावून घेणे व त्या उपाययोजनांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणे, ही जबाबदारी असताना जिल्हा परिषद यंत्रणा मात्र मतदान वाढीसाठी मतदान जागृती कार्यक्रम (स्वीप) घेण्यात व्यस्त आहे.

सर्व विभागप्रमुख यासाठी गावोगावी जात असले, तरी तेथील नागरिकांच्या मुख्य समस्यांकडे पाहण्यास वेळ नाही. त्यातच, जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कारकीर्दीस राबविलेल्या योजनांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी कॉफी टेबल बुक तयार करण्याचे काम सुरू आहे. स्वीपमधील कामांतून सर्व यंत्रणा या बुकसाठी माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे दुष्काळाचा प्रशासनाला विसर पडल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय राजवटीला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. दोन वर्षांत प्रशासकाने केलेली कामे जिल्ह्यातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने कॉफी टेबल बुक तयार करण्याचा निर्णय झाला आहे. या बुकमध्ये प्रशासनाने केलेली कामे, नावीन्यपूर्ण योजना, घेतलेले महत्त्वाचे निर्णय, प्राप्त झालेली पारितोषिके, केलेली कामगिरी याबाबतची माहिती दिली जाणार असून, त्यासाठी पाच लाख रुपयांचा सेस निधी खर्च केला जाणार आहे. (Latest Marathi News)

प्रशासनाने केलेल्या नावीन्यपूर्ण योजना, कामांना प्रसिद्धी मिळालेली असताना स्वतंत्र बुक तयार करण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर बुक तयार करण्यासाठी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती देण्याची सक्ती केली जात असल्याची चर्चा आहे. आधीच जिल्ह्यातील स्वीप कार्यक्रमांतर्गत अधिकारी, कर्मचारी फिल्डवर काम करीत आहेत.

यातच कॉफी टेबल बुक माहितीसाठी तगादा लावला जात असल्याने कर्मचाऱ्यांसह अधिकारी वर्गात नाराजीचा सूर आहे. स्वीप कामासाठी अधिकाऱ्यांना तालुक्यांना पाठविले जात आहे. मात्र, यात दुष्काळाचा आढावाही होत नसल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याचे टॅंकर दिवसेंदिवस वाढत आहेत.

पाण्यासाठी ग्रामीण भागात सामान्यांना वणवण भटकंती करावी लागत आहे. चारा टंचाईचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या परिस्थितीत जिल्हा परिषद यंत्रणेने दुष्काळ आढावा बैठक घेऊन, दुष्काळातील अडचणी, उपाययोजना यांची माहिती घेणे अपेक्षित आहे. यापूर्वी पदाधिकारी असतानाही प्रशासनाच्या दुष्काळ आढावा बैठका झालेल्या आहेत.

तत्कालीन काही मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः फिल्डवर उतरलेले आहेत. तसेच, अधिकाऱ्यांनी तालुके दौरे केले आहेत. परंतु, दुष्काळाची कामे करण्याऐवजी जिल्हा परिषद यंत्रणा कॉफी टेबल बुक तयार करण्यात मग्न दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT