MD drugs crime esakal
नाशिक

Nashik Drug Case: MD चा कारखाना थाटणाऱ्या काळेला अटक; ड्रग्जमाफिया सनी पगारेला केली मदत

सकाळ वृत्तसेवा

Nashik Drug Case : ललित पाटीलपाठोपाठ नाशिकमध्ये ड्रग्जमाफिया म्हणून सनी पगारे समोर आला आहे. पगारे याचा सोलापुरातील एमडी ड्रग्जचा कारखाना नाशिक पोलिसांनी उद्‍ध्वस्त केल्यानंतर या कारखान्यासाठी भाडेकरार केलेल्या मनोहर पांडुरंग काळे (रा. देवळाली गाव, नाशिक रोड) यास पोलिसांनी अटक केली आहे.

सोलापुरातील कारखान्याचा करार सनी पगारे याने काळेच्या नावाने केल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. (Nashik Drug Case Arrested for setting up MD factory Drug mafia helped Sunny Pagar Crime)

सप्टेंबर महिन्यात नाशिक रोड पोलिसांनी सामनगाव येथे गणेश शर्मा यास एमडी ड्रग्जसह पकडले होते. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच वडाळागाव आणि शिंदेगावात एमडी ड्रग्जची कारवाई झाली.

सामनगाव गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी मुख्य सूत्रधार सनी पगारे, सुमीत पगारे, अर्जुन पिवाल, मनोज गांगुर्डे यांना अटक केल्याने गुन्ह्यातील रॅकेटची उकल सुरू झाली.

सनी पगारेने सोलापूरातील मोहोळ येथील खासगी औद्योगिक वसाहतीमध्ये थाटलेल्या कारखान्याची खबर मिळताच शहर गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी छापा टाकून कारखाना उद्‍ध्वस्त केला.

यातून कोट्यवधीचा एमडी ड्रग्जचा साठा आणि कच्चा माल शहर पोलिसांच्या हाती लागला आहे. या कारखान्यासाठी ड्रग्जमाफिया सनी पगारे याने काळे यास एमडी ड्रग्जच्या व्यवसायात सामावून घेताना सोलापुरातील मोहोळ येथे कारखाना सुरू करण्याचा प्लॅन केला.

त्यासाठी बंद पडलेल्या श्री स्वामी समर्थ केमिकल कंपनीमालकाशी भाडेकरार करताना तो मनोहर काळे याच्या नावे केला.

तसेच, काळे यास कारखान्यात काय उद्योग करावयाचा आहे, याची पुरती जाणीव असल्याने पोलिसांनी चौकशीसाठी काळे यास अटक केली आहे. या प्रकरणात आणखीही काही संशयित फरारी असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

ड्रग्जमाफिया सनीची कसून चौकशी

एमडी ड्रग्जच्या माध्यमातून ललित पाटील याने सोन्यासह मालमत्तेत पैसे गुंतविले. त्याचप्रमाणे, ड्रग्जमाफिया सनी पगारे यानेही गुंतवणूक केलेल्या मालमत्तेचा शोध पोलिस घेत आहेत.

सराईत गुन्हेगार असलेल्या सनी पगारे याचे गेल्या काही वर्षातील उच्च राहणीमान पाहता पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. तर, संशयित मनोहर काळे याचे पगारेच्या गोसावीवाडीतील कार्यालयात नेहमी जा-ये होती.

मात्र काचा-खिडक्या बसविणाऱ्या मनोहर काळेचा या गुन्ह्यातील सहभाग निश्चित झाला आहे. तर, या व्यवसायात आणखी कोणी बढी आसामी गुंतली आहे काय, फंडिंग कोणाचे यांसह अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी शहर गुन्हे शाखा कसून तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT