Drug Case esakal
नाशिक

Nashik Drug Case : ड्रग्जमाफिया पगारे-पिवालटोळीवरील ‘मोका’ नामंजूर; शहर पोलिसांना धक्का

Drug Case : सामनगावमध्ये मॅफेड्रॉन (एमडी) तस्करी करून सोलापुरात कारखाने व गुदाम चालविणारा ड्रग्जमाफिया सनी पगारे-अर्जुन पिवाल टोळीविरोधातील लावण्यात आलेला ‘मोका’ पोलिस महासंचालक कार्यालयाने फेटाळून लावला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Drug Case : सामनगावमध्ये मॅफेड्रॉन (एमडी) तस्करी करून सोलापुरात कारखाने व गुदाम चालविणारा ड्रग्जमाफिया सनी पगारे-अर्जुन पिवाल टोळीविरोधातील लावण्यात आलेला ‘मोका’ पोलिस महासंचालक कार्यालयाने फेटाळून लावला आहे. ड्रग्ज टोळीविरोधातील ‘मोका’ पोलिस महासंचालकांनी नामंजूर केला आहे. पगारे-पिवाल टोळीविरोधातील एमडी तस्करीचा गुन्हा कायम असून, या प्रकरणी अद्यापही मुख्य संशयित पोलिसांच्या हाती लागलेला नाही. (Nashik Drug Case Moka on drug mafia pagare piwaltoli rejected )

सप्टेंबर २०२३ मध्ये सामनगाव येथे ड्रग्ज पेडलर्सला अटक केल्यावर शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने या टोळीचा पर्दापाश करीत सोलापुरातील दोन कारखाने उद्‌ध्वस्त केले होते. पगारे-पिवाल टोळीला अटक केली होती. तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या बदलीचे आदेश नोव्हेंबर २०२३ मध्ये आले असता, त्याचवेळी त्यांनी पदभार सोडण्यापूर्वी ड्रग्जतस्करांना दणका देत पगारे-पिवाल टोळीविरोधात ‘मोका’अंतर्गत कारवाई केली होती. (latest marathi news)

यात गणेश शर्मा, गोविंदा साबळे, आतिश ऊर्फ गुड्ड्या चौधरी, सनी व सुमीत हे पगारे बंधू, मनोज गांगुर्डे, अर्जुन पिवाल, भूषण ऊर्फ राजा मोरे, मनोहर काळे, वैजनाथ हावळे, प्रथमेश मानकर, उमेश व अमोल वाघ, अक्षय नाईकवाडे, भूषण मोरे या संशयितांना अटक करण्यात आली होती. ‘मोका’चा तपास तत्कालीन सहाय्यक आयुक्त आनंदा वाघ यांच्याकडे होता. गुन्हे शाखा युनिट एक आणि अमली पदार्थविरोधी पथकाने या टोळीला गजाआड केले होते.

तांत्रिक मुद्द्यांचा अभाव

शरीराविरोधातील गंभीर स्वरूपाचे संघटितपणे गुन्हे असल्यास संशयित टोळीविरोधात ‘मोका’न्वये कारवाई केली जाते; परंतु या गुन्ह्यात शरीराविरोधातील हल्ला, हिंसेसंदर्भातील कोणतेही कलम नसल्याच्या तांत्रिक मुद्द्याअभावी हा ‘मोका’ पोलिस महासंचालक कार्यालयाकडून फेटाळण्यात आल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT