temperature  esakal
नाशिक

Nashik News : पावसाची विश्रांती, तापमानात वाढ! कमाल तापमान पुन्‍हा 40 अंशांच्‍या उंबरठ्यावर

Nashik News : तप्त उन्‍हाळ्याच्‍या झळा सहन करताना कमालीचा उकाडा नाशिककरांना जाणवत होता. अशातच चार दिवसांपूर्वी झालेल्‍या वळिवाच्‍या पावसामुळे पाऱ्यात घसरण झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गेल्‍या चार दिवसांपासून सुरू असलेल्‍या वळिवाच्या पावसाने बुधवारी (ता.१५) विश्रांती घेतली. दिवसभर ढगाळ वातावरण राहिले तरी सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस बरसला नव्‍हता. त्यामुळे पारा पुन्‍हा वाढला असून, कमाल तापमान ३८.३ अंश सेल्सिअसवर नोंदविले गेले. आठ दिवसांपूर्वीपर्यंत नाशिकचे तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले होते. (Due to heavy rain temperature level droppe)

तप्त उन्‍हाळ्याच्‍या झळा सहन करताना कमालीचा उकाडा नाशिककरांना जाणवत होता. अशातच चार दिवसांपूर्वी झालेल्‍या वळिवाच्‍या पावसामुळे पाऱ्यात घसरण झाली होती. अचानक झालेल्‍या पावसामुळे ठिकठिकाणी तळे साचले असले तरी किमान उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला होता.

बुधवारीदेखील शहरासह जिल्‍हाभरात ढग दाटलेले होते. हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान खात्‍याने वर्तविला होता. उत्तर महाराष्ट्र स्‍तरावर दाब निर्माण झाल्‍याने पावसाची शक्‍यता होती. परंतु नाशिक शहरात मात्र सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस झाला नव्‍हता. (latest marathi news)

पावसाने विश्रांती घेताच तापमानात वाढ नोंदविली गेली आहे. आता पुन्‍हा पार चाळीस अंश सेल्सिअसच्या उंबरठ्यावर पोचला आहे. बुधवारी नाशिकचे कमाल तापमान ३८.३ अंश सेल्सिअस राहिले. कमाल तापमानात वाढ झाली असली तरी किमान तापमानातील घसरण कायम असून, २१.५ अंश सेल्सिअस इतक्‍या किमान तापमानाची नोंद घेण्यात आली आहे.

वाऱ्याच्‍या गतीमध्ये वाढ

ढग दाटलेले असताना, वातावरणात तीव्र वारे वाहत होते. ३० ते ४० किलोमीटर प्रतितास या गतीने वारे वाहत असल्‍याची नोंद हवामान खात्‍याने घेतली होती. वातावरणातील वाऱ्यामुळे उकाड्याची तीव्रता कमी झालेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ए. आर. रहमान यांच्या मुलाचा अपघात; पहाटे 3 वाजता Porsche ची धडक

Marathi News Live Updates : जंतरमंतरवरील लाठीचार्जवर गृहमंत्री अमित शहा लोकसभेत निवदेन देण्यास तयार; विरोधकांचा आक्रमक पवित्रा

Blocked Nose: सर्दी नाही तरी रात्रीच्या वेळी नाक का बंद होते? जाणून घ्या कारण आणि सोपे उपाय!

Mumbai Train Disturb: मुलुंड स्टेशनमध्ये ट्रेनवर काहीतरी पडले; आग लागली.. धुरांचे लोट अन् मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत Video

Bhudargad Fort Wall Collapse : अवघ्या 2 वर्षांत ऐतिहासिक भुदरगड किल्ल्याची 50 फूट लांबीची तटबंदी कोसळली; कोट्यवधींचा निधी पाण्यात, गडप्रेमींचा तीव्र संताप

SCROLL FOR NEXT