non-veg dish esakal
नाशिक

Nashik News : श्रावण तोंडावर आल्याने ‘नॉनव्हेज’ मागणीत मोठी वाढ; भाव वधारले

Nashik News : सध्या नॉनव्हेजला पसंती मिळत आहे. त्यामुळे तसेच पुढील महिन्यात श्रावण असल्याने मटण, चिकन व माशांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

दत्ता जाधव : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : बदललेल्या वातावरणामुळे सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे बुधवारच्या आठवडे बाजारातही भाज्यांच्या भावात मोठी वाढ झाली आहे. पैसे देऊनही चांगल्या दर्जाचा भाजीपाला दुर्मिळ झाल्याने सध्या नॉनव्हेजला पसंती मिळत आहे. त्यामुळे तसेच पुढील महिन्यात श्रावण असल्याने मटण, चिकन व माशांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. (Due to Shravan next month huge increase in demand for chicken and fish)

अर्थात मागणी वाढल्याने नॉनव्हेजच्या दरानेही उसळी घेतली आहे. दर बुधवारी गोदाघाटावर भाजी बाजार भरतो. या ठिकाणी सर्वच प्रकारच्या भाज्या गृहिणींच्या बजेटमध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठी आर्थिक उलाढाल होते, परंतु बदललेल्या वातावरणात फळभाज्या, पालेभाज्यांसह वेलवर्गीय भाज्यांच्या आवकेत मोठी घट झाली आहे.

यामुळे सर्वच प्रकारच्या भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारातून मेथी, कोथिंबीर गायब झाली आहेत. मेथीची व कोथिंबिरीच्या जुडीसाठी पन्नास ते साठ रुपये मोजावे लागतात. त्यामुळे अनेकांनी भाजीपाल्याऐवजी नॉनव्हेजला पसंती दिली आहे.

श्रावणात मांसाहार वर्ज्य

पुढील महिन्यात श्रावण आहे. या काळात हिंदू धर्मियांसह अन्य धर्मातील अनेकजण महिनाभर मांसाहार वर्ज्य करतात. साहजिकच या काळात मटण, चिकनच्या मागणीत मोठी घट होते. मात्र श्रावण महिन्यापूर्वी नॉन व्हेजवर ताव मारण्याची संधी खवय्या सोडत नसल्याने या काळात नॉनव्हेजच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. श्रावण तोंडावर आल्याने सध्या नॉनव्हेजच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे विक्रेते सांगतात. (latest marathi news)

किलोप्रमाणे भाव (रुपयांत)

मटण -

बोकडाचे मटण - ७०० ते ८०० .

बॉयलर चिकन - १८० ते २००

गावठी चिकन - ३५० ते ४००

मच्छी -

पापलेट - १००० ते १२००

वाम - १००० ते १२००

रावस - १४००

सुरमई - १००० ते १२००

ओले बोंबील - ४०० ते ५००

शिंगाडा- ५०० ते ६००

"पुढील महिन्यात श्रावण असल्याने अनेकांनी नॉनव्हेजला पसंती दिली आहे. मात्र पावसामुळे आवक मंदावल्याने सर्वच प्रकारच्या माशांच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. गोड्या व खाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या माशांच्या मागणीत वाढ झाल्याने त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे." - सोपान पवार, मच्छी विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT