Electricity Price Hike
Electricity Price Hike esakal
नाशिक

Electricity Price Hike: वीज दरवाढीचा उद्योग क्षेत्राला ‘शॉक’! औद्योगिक विकासाच्या वाटा खडतर करणारी दरवाढ, उद्योजकांकडून विरोध

सकाळ वृत्तसेवा

सातपूर : इतर राज्यांच्या म्हणजे गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजदर हे सर्वाधिक आहेत. उद्योजकांना आवश्‍यक सुविधा उपलब्ध न झाल्याने तीन-चार वर्षांपासून राज्यातून उद्योग अन्य राज्यांमध्ये जात आहेत. अशा वेळी ‘महावितरण’कडून अचानक आचारसंहितेत करण्यात आलेली वीज दरवाढ औद्योगिक विकासाच्या वाटा खडतर ठरणारी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील लघू, सूक्ष्म व मध्यम उद्योजकांमधून उमटत आहे.

तसेच, ही दरवाढ मागे घेण्यासाठी आंदोलनाचाही पवित्रा काही संघटनांनी घेतला आहे. त्यासाठी ‘निमा’चे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले, की महाराष्ट्रातील सर्व उद्योग संघटनांची एकत्रीत बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार आहे. (nashik Electricity price hike shock to industry sector news)

महावितरण’ने लघुदाब गटातील उद्योजकांसाठी शून्य ते २० वॉटसाठी दरमहा ५८३ रुपये, २० वॉटसाठी प्रतिकिलोवॉट ॲम्पिअर ३८८ रुपये एवढी वीजदरवाढ केली आहे. उच्चदाब उपगटातील उद्योजकांसाठी हेच वीजदर प्रतिकिलोवॉट ॲम्पिअर ५४९ रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहेत.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील लघू, सूक्ष्म व मध्य उद्योगांबरोबरच अनेक मोठे उद्योगही आहेत. त्यामुळे हजारो कंपन्यांना या वीजदरवाढीचा फटका बसेल. त्यामुळे सर्वच स्तरांतून या दरवाढीबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गुजरातसह इतर राज्यांत वीजदर स्वस्त आहेत. तसेच, उद्योगांच्या वाढीसाठी या राज्यांमध्ये अनेक सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळे तीन ते चार वर्षांपासून अनेक उद्योग राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, हरियाना, तमिळनाडू या राज्यात जात आहेत.

तसेच, सध्या येथे असलेले उद्योगही महाराष्ट्रात विस्तार करण्यास फारसे इच्छुक नाहीत. त्यामुळे या दरवाढीचे अत्यंत विपरीत परिणाम उद्योग क्षेत्रात होऊ शकतात, अशी भीती लघुउद्योजक पदाधिकारी संजय महाजन यांनी व्यक्त केली आहे.

नाशिक जिल्हा निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असताना अचानक वीजदर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला तर नक्कीच महाराष्ट्रातील उद्योजक आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या उत्पादनांना निर्यात करू शकणार नाहीत. इतरांच्या तुलनेत किमतीत फार मोठा बदल दिसून येईल, असे मत ‘आयमा’चे अध्यक्ष ललित बूब यांनी व्यक्त केले.  (latest marathi news)

मार्च २०२४ पर्यंतचे वीजदर- (उच्चदाब उद्योगांसाठी)

४९९ रुपये प्रतिकिलोवॉट ॲम्पिअर प्रतिमहिना

१ एप्रिल २०२४ पासून लागू झालेले दर

(लघुदाब उद्योगांसाठी)

० ते २० वॉट : ५८३ रुपये प्रतिमहिना

२० वॉटपासून पुढे ३८८ रुपये प्रतिवॉट ॲम्पिअर प्रतिमहिना

(उच्चदाब उद्योगांसाठी)

५४९ रुपये प्रतिवॉट ॲम्पिअर प्रतिमहिना

उद्योगनगरीतील उद्योगांकडून वापरली जाणारी वीज

सातपूर एमआयडीसी परिमंडळ प्रतिमाह आकडेवारी

-औद्योगिक क्षेत्राला वितरित करण्यात आलेली वीज : ४५ मिलियन युनिट

-औद्योगिक क्षेत्राला पुरविलेल्या वीजबिलाची रक्कम : १५ कोटी रुपये

"‘एमईआरसी’ने तीन वर्षांच्या दरवाढीचा प्रस्ताव दिला. त्याच वेळी निमा, आयमा, लघुउद्योग भारतीसह महाराष्ट्रातील औद्योगिक संघटनांनी तीव्र विरोध करीत या दरवाढीवर आयोगासमोर तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यावर सुनावणी न करताच ही दरवाढ करीत आहे. यामुळे उद्योगांचे मोठे नुकसान होत आहे. एका बाजूला आपण ‘एक देश-एक कर’ची घोषणा करतो. दुसऱ्या बाजूला मात्र वीज दर विविध राज्यांत कमी-जास्त असल्याने महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यांत जात आहेत, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. सदर गंभीर दरवाढीच्या मुद्यावर ‘निमा’, ‘आयमा’सह महाराष्ट्रातील औद्योगिक संघटनांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाईल."

- धनंजय बेळे, अध्यक्ष (निमा)

"अनेक वर्षांपासून उद्योग क्षेत्रासह घरगुती दरवाढीचा दणका दिला जातो. या वर्षीही निवडणुकीची आचारसंहिता असताना हा दणका दिला. याबाबत लोकप्रतिनिधींना मात्र जनतेच्या व उद्योगाच्या प्रश्‍नांशी देणे-घेणे नाही. त्यांना फक्त निवडणूक लक्षात राहते."

- मिलिंद राजपूत, पॉवर कमिटी, महाराष्ट्र चेंबर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT