Empowered self-help group women making sanitary pads.  esakal
नाशिक

Women Empowerment: ‘सॅनिटरी पॅड’ निर्मितीतून कष्टकरी महिला बनल्या उद्योजिका! निळवंडीच्या सक्षम बचतगटाचे बदलले जीवनमान

Nashik News : महिलांनी स्वतः सक्षम महिला समूह बचतगटाच्या माध्यमातून पॅडची निर्मिती करत तब्बल १ लाख २५ हजार इतका नफा मिळविला.

दीपिका वाघ

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी गावातील महिलांनी मासिक पाळीत वापरला जाणारा सॅनिटरी नॅपकिन हा शब्दही कधी ऐकला नव्हता, वापरणे तर दूरची गोष्ट. सातवी- आठवी शिकलेल्या बायका शेतात मोलमजुरी, शिवणकाम करून उदरनिर्वाह करत.

त्यातून फार उत्पन्न मिळत नव्हते. गावात इकोसॅन सर्व्हिसेस फाउंडेशन (पुणे) व पर्नोर्ड रिकार्ड इंडिया फाउंडेशनचे प्रकल्प सल्लागार आदित्य भेडसगावकर, सानिका घळसासी, तृप्ती पाटील, भाग्यश्री सोमवंशी यांनी गावातील महिलांना सॅनिटरी नॅपकिनचा वापर, उत्पादन आणि त्याची विक्री कशी करायची याबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर महिलांनी स्वतः सक्षम महिला समूह बचतगटाच्या माध्यमातून पॅडची निर्मिती करत तब्बल १ लाख २५ हजार इतका नफा मिळविला. (nashik women Empowerment entrepreneurs sanitary pads Nilawandi marathi news)

निळवंडीतील महिलांची संख्या ९८७, त्यात गावात एकही मेडिकल नाही. काही आणायचे असल्यास थेट दिंडोरी गाठावे लागते. सॅनिटरी पॅड फाउंडेशनच्या मदतीने या महिलांना गावात विकास केंद्र बांधून देवून सॅनिटरी पॅड बनविण्याचे प्रशिक्षण दिले गेले. आता या महिला स्वतःही पॅड वापरतात त्याबद्दल शाळेत, गावागावात जाऊन जनजागृती करून मार्गदर्शनही करतात.

सीमा ओलांडून या महिला आता व्यवसायानिमित्त गावाबाहेर पडू लागल्या आहेत. सक्षम बचतगटात केवळ दहा महिला असून सर्वांचे शिक्षण बारावीच्या खालोखाल झाले आहे. सहा महिन्यांपासून या महिला सॅनिटरी पॅड बनवत आहे. गेल्या दोन महिन्यात महिलांनी २५ हजार पॅड बनविण्याची ऑर्डर मिळविली.

त्यातून उद्योजक होण्याची भावना निर्माण झाल्यानंतर अधिक जोमाने काम करू लागल्या. दररोज ५०० ते हजार पॅड त्या स्वतः तयार करतात. या उद्योगात त्यांना नफा होत असून, या उद्योगाच्या माध्यमातून सक्षम महिला बचतगट लाखोंची उलाढाल करत आहे.

सॅनिटरी पॅडचे वैशिष्टे

सॅनिटरी पॅडची किंमत पाच रुपये असून सहा पॅडचे पूर्ण पॅकेट ३० रुपयांना मिळते. या पॅडमध्ये प्लॅस्टिकचा वापर अल्प असल्याने त्याचे विघटन होते. पॅड जमिनीत पुरल्यास ३० ते ४० दिवसात त्याचे विघटन होऊन त्याचे खत तयार होते.

"गावात महिलांसाठी कोणालाही रोजगार उपलब्ध नव्हता. उद्योग केंद्र बांधून दिल्याने स्वतःच्या हक्काची जागा उपलब्ध झाली. शिवाय या जागेत व्यवसाय करताना सुरक्षित वाटते. कच्चा माल मुंबईतून मागवण्यापासून वस्तू तयार करून, त्या पाठवण्यासाठी पॅकिंग करून, कुरिअर करेपर्यंत आम्ही सर्व गोष्टी शिकलो. त्यामुळे बाहेरच्या व्यावसायिक, जगाशी संबंध आला. आता कुटुंबाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुधारण्यात आम्ही सक्षम झालो आहोत."

- सुवर्णा जाधव, अध्यक्षा, सक्षम महिला बचतगट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT