Employees of Municipal Encroachment Team removing encroachments from the procession route.
Employees of Municipal Encroachment Team removing encroachments from the procession route.  esakal
नाशिक

Nashik News : मिरवणुक मार्गावर मनपातर्फे अतिक्रमण निर्मुलन मोहीम; पथक माघारी फिरताच अतिक्रमण जैस थे

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने महापालिका पश्चिम विभागाकडून मिरवणूक मार्गावर अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबविली. मिरवणुक मार्गात अडथळा निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांचे अतिक्रमण यावेळी काढण्यात आले. मोहिमेत अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने एक ट्रक साहित्य जप्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने जुने नाशिक राजवाडा, वाकडी बारव ते शिवाजी रोड डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकपर्यंत मिरवणूक काढण्यात येत असते. (Nashik Encroachment removal campaign by Municipal Corporation on procession route marathi news )

राजवाडा येथून मिरवणूक प्रारंभ होऊन, वाकडी बाराव, दूध बाजार, भद्रकाली मार्केट, बादशाही कॉर्नर, मेन रोड, रविवार कारंजा, रेड क्रॉस चौक, महात्मा गांधी रोड, सांगली बँक सिग्नल, टिळकपत, शालिमार अशा मार्गाने मिरवणूक जात असते. रविवार (ता.१४) सायंकाळी मिरवणूक काढण्यात येणार होती.

सकाळी ११ ते १ वाजेच्या दरम्यान अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर यांच्या आदेशाने पश्चिम विभागाच्या अतिक्रमण विभागाचे विभागीय अधिकारी योगेश रकटे यांच्या मार्गदर्शनात पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागुल, जावेद शेख, सुनील कदम, बापू लांडगे, रमेश शिंदे, जगन्नाथ हमारे, संजय सूर्यवंशी, संतोष पवार तसेच पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी मिरवणूक मार्गावर कारवाई करून कपडे, स्टॅन्ड बोर्ड, खुर्च्या, टेबल, प्लास्टिक पुतळे आदी एक ट्रक साहित्य जप्त करत मिरवणूक मार्ग मोकळा करण्यात आला. (latest marathi news)

अतिक्रमण संदर्भात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत सीबीएस, एमजी रोड, भद्रकाली, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रविवार कारंजापर्यंत मिरवणूक मार्गावर अतिक्रमण मोहीम राबविली. दहीपूल भागात अतिक्रमण काढण्यात आले.

मोहीम औटघटकेचीच

शहरातील मेनरोड, दहिपुल एमजी रोड आदी भागात महापालिका अतिक्रमण निर्मुलन पथकाकडून सातत्याने अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविली जात असते. मात्र पथक कारवाई केल्यानंतर पुढे निघून जाताच अतिक्रमण जैसे थे होत असते. त्यामुळे महापालिका अतिक्रमण निर्मुलन विभागाची ही कारवाई केवळ औटघटकेची ठरत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT