Sachin Joshi accepting first place prize of 51 lakhs and badge of honor received by Espalier Heritage School from Chief Minister Eknath Shinde, School Education Minister Deepak Kesarkar, Education Commissioner Suraj Mandre. esakal
नाशिक

Nashik News: इस्‍पॅलियर हेरिटेज स्‍कूलचा सन्मान; मुख्यमंत्री शिंदेंच्‍या हस्‍ते राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक प्रदान

Nashik : इस्‍पॅलियर हेरिटेज स्‍कूलला 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' स्‍पर्धेतील खासगी शाळा गटातील राज्यस्तरीय प्रथम पुरस्‍कार जाहीर झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : स्‍वच्‍छता, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब अशा विविध निकषांची पूर्तता करताना येथील इस्‍पॅलियर हेरिटेज स्‍कूलला 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' स्‍पर्धेतील खासगी शाळा गटातील राज्यस्तरीय प्रथम पुरस्‍कार जाहीर झाला होता.

मंगळवारी (ता.५) मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि शिक्षण आयुक्‍त सूरज मांढरे यांच्‍या हस्‍ते स्कूलचे प्रमुख सचिन उषा विलास जोशी यांनी पुरस्‍कार स्‍वीकारला. (Nashik Espalier Heritage School was declared state level first prize in Chief Minister School Sundar School competition)

पुरस्‍कारापोटी प्राप्त ५१ लाख रुपयांचा निधी जिल्‍हा परिषदेच्या शाळा विकासाठी आणि फिरती शाळा बनविण्यासाठी वापरला जाणार असल्‍याचा पुनर्रूच्चार श्री.जोशी यांनी केला. 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या स्‍पर्धेचा निकाल गेल्‍या रविवारी (ता.३) जाहीर करण्यात आला होता. यामध्ये खासगी शाळांच्‍या गटातून नाशिकच्‍या इस्‍पॅलियर हेरिटेज स्‍कूलने राज्‍यस्‍तरावर प्रथम क्रमांक पटकावला होता.

स्‍पर्धेतील ५१ लाख रुपयांचे पारितोषिक शाळेला जाहीर झाले होते. या स्‍पर्धेतील निकषांची पूर्तता करताना स्‍पर्धेअंतर्गत विविध टप्‍पे यशस्वीरीत्या पूर्ण केले होते. वेगवेगळ्या पाच समित्‍यांनी महिन्‍याभरापासून शाळेला भेट देत विविध बाबींची पडताळणी केली होती. शंभरपैकी इस्पॅलिअर हेरिटेज स्कूलला ९७.५ गुण मिळाले होते. (latest marathi news)

यातून खासगी शाळांच्‍या गटातून शाळेने राज्‍यात प्रथम क्रमांक पटकावला होता. मूल्‍यमापनातील प्रत्येक टप्प्यावर शाळेचे सौंदर्यीकरण, स्वच्छता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि मुख्य म्हणजे शाळेत शेती उपक्रम तसेच परसबाग अनिवार्य होते. नावीन्यपूर्ण उपक्रम आणि तंत्रज्ञानाचा वापर हा महत्त्वाचा निकष होता.

जि. प. शाळांचे सक्षमीकरण ः जोशी

पुरस्‍कार स्वीकारतानाच सचिन उषा विलास जोशी यांनी आपल्‍या निर्धाराचा पुनर्उच्चार केला. पुरस्‍कारासाठी मिळालेल्‍या ५१ लाख रुपयांच्‍या बक्षीस योजनेचा उपयोग जिल्हा परिषदेच्या शाळांच्या विकासासाठी केला जाईल. जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी फिरती शाळा बनवण्यासाठी वापर केला जाणार असल्‍याचेही श्री. जोशी यांनी नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT