Wedding Ceremony
Wedding Ceremony esakal
नाशिक

Nashik Wedding Ceremony : मेहंदी, हळद अन साखरपुडाही लॉन्सवर! वर-वधूच्या इच्छेखातर लग्नांची रितच बदलली

मोठाभाऊ पगार

देवळा : लग्नसमारंभासाठी बुक होणारे लॉन्स आता लग्नाच्या सर्वच विधीसाठी बुक होऊ लागले आहे. एऱव्ही मेहंदी, साखरपुडा आणि हळद हे घरी होणारे कार्यक्रम आता सोयीसाठी लॉन्सवर होऊ लागले आहेत. वर आणि वधू जर दोन्ही नोकरीला असतील तर त्यांच्या हट्ट अथवा इच्छेपायी दोन्ही पालक दोन पैसे मोजायलाही मागेपुढे पाहत नाही अशी सध्याची स्थिती आहे. त्यात यंदाच्या कडक उन्हाने भर घातली आहे. त्यामुळे फक्त लग्नविधीसाठी बुक असलेले लॉन्स आता एक दिवसाची आणखी बुकींग ॲड करून घेत आहेत. (Nashik wedding ceremony changed according to wishes of bride groom)

गेल्या काही वर्षात साखरपुडा असो विवाह सोहळा असो की वाढदिवसासारखे काही कार्यक्रम, तो मंगलकार्यालय वा लॉन्सवर शाही थाटात करण्याची पद्धत चांगलीच रुजली आहे. ग्रामीण भागातही हे कार्यक्रम मोठ्या शाही थाटातआणि तेही मंगलकार्यालय किंवा लॉन्सवर पार पडत आहेत. यामुळे कार्यक्रमांचे मुहूर्त साधून परिसरातील लॉन्स आता वऱ्हाडी मंडळी व पाहुण्यांच्या गर्दीने फुलताना दिसत आहेत.

पूर्वी विवाहासाठीच लॉन्सचा आग्रह धरणारी मंडळी आता मेहेंदी अन साखरपुडाही लॉन्सवरच पार पाडत आहेत. परिसरातील वाड्या-वस्त्यांपर्यंत शहरांसारखे केटरर्स पोचू लागल्याने भाऊबंदांच्या खांद्यावर असणारी वऱ्हाडी मंडळींच्या जेवणाचा भार आता हलका झाला आहे. त्यामुळे लाकडे फोडणे, तांदूळ निवडणे, इतर तयारी करणे आदी कामांसाठी भाऊबंदकीची जबाबदारी नगण्य राहिली आहे.  (latest marathi news)

एकाच लॉनवर दोन-तीन कार्यक्रम

एवढेच काय नाश्ता-जेवण, ब्राह्मण, माळा, घोडा, अक्षदा अशा सर्व गोष्टी पॅकेजमध्ये समाविष्ट असल्यामुळे वधूपित्यांचा ताण हलका झालेला दिसत आहे. त्यामुळे बहुतांश लॉन्सच्या तारखा फुल्ल आहेत. काही ठिकाणी एकाच लॉन्सवर दोन-तीन कार्यक्रम पार पडत आहे त्यामुळे परिसरातील स्वयंपाकी, वाढपी मुले व महिला यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मे महिन्यात लग्नतिथी नसल्याने सध्या विवाहसमारंभांची रेलचेल आहे.

"पूर्वी ७००-८०० व्यक्तींच्या स्वयंपाकासाठी दोन दिवस आधीपासून तयारी करावी लागायची. परंतु आता पॅकेज पद्धतीमुळे मेनू ठरवून व पाहुण्यांची संख्या सांगून सर्व काही व्यवस्थित पार पडते. धावपळ होत नाही. वारा, ऊन, पाणीपाऊस यामुळे हा पर्याय स्वीकारला जात आहे."

- उद्धव भामरे, खुंटेवाडी, ता.देवळा.

"साधारणपणे हजार, पंधराशे ते दोन हजार पाहुण्यांपर्यंत आम्ही लॉन्स उपलब्ध करून देतो. आतापर्यंत अनेक व विविध प्रकारचे कार्यक्रम यशस्वीपणे झाले आहेत. पाहुणे मंडळी व यजमान यांच्या समाधानासाठी सर्व परीने आमचा प्रयत्न असतो."

- रामदास गुंजाळ, संचालक, वत्सला लॉन्स देवळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

ब्रेकिंग! ‘आरटीई’ प्रवेशाला मंगळवारपर्यंत मुदतवाढ; शिक्षण संचालकांचे आदेश; आता मुदतवाढ नसल्याचेही स्पष्टीकरण

Nagpur Temp : नागपूरमध्ये नोंद झालेलं 56 डिग्री तापमान होतं चुकीचं! हवामान विभागाला का द्यावं लागलं स्पष्टीकरण?

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

SCROLL FOR NEXT