नाशिक : केंद्राच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयामार्फत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व दळणवळणाशी निगडित विविध पुरस्कारांची घोषणा केली आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक, दळणवळणाच्या नियोजनात नागरिकांचा सहभाग या विभागातून नाशिक महापालिकेला पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन अर्बन ट्रान्सपोर्ट’ या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी (ता.२९) रात्री आठला नवी दिल्ली येथील सुषमा स्वराज भवन येथे होणार आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होईल.
मंत्रालयातील अधिकारी जयदीप यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना पत्राच्या माध्यमातून पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती देत पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित राहाण्यासाठी आमंत्रित केले आहे.
पत्रात नमुद केल्यानुसार नाशिक महापालिकेला अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन अर्बन ट्रान्स्पोर्ट हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सार्वजनिक वाहतूक, दळणवळणाच्या नियोजनात नागरिकांच्या उत्कृष्ट सहभागाची दखल घेताना या गटातून हा पुरस्कार देण्यात आला आहे. शहरात नुकताच शहर बस वाहतूक सेवा महापालिकेमार्फत चालविली जात आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांच्या पार्श्वभूमीवर मेट्रोनिओ व यासारखे प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यातच नाशिक महापालिकेला पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याने नाशिकचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर झळकणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.