Riders participating in the Super Stage of Rally of Maharashtra held at Hotel Grape County. esakal
नाशिक

Nashik News : नाशिककरांनी अनुभवला सुपरस्पेशल स्टेजचा थरार; रॅली ऑफ महाराष्ट्राला प्रारंभ

Nashik News : ब्लू बॅंड स्पोर्टस् आयएनआरसी २०२४ च्या रॅली ऑफ महाराष्ट्राचा सुपर स्पेशल स्टेजने (एसएसएस) प्रारंभ झाला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ब्लू बॅंड स्पोर्टस् आयएनआरसी २०२४ च्या रॅली ऑफ महाराष्ट्राचा सुपर स्पेशल स्टेजने (एसएसएस) प्रारंभ झाला. ग्रेप कौंटी हॉटेलच्या परिसरात शुक्रवारी (ता. ३१) प्रेक्षकांसाठी रॅलीतील सुपर स्पेशल स्टेजचा थरार अनुभवला. रॅलीत यंदा तब्बल ५३ प्रवेशिका नोंदविण्यात आल्या आहे. त्यात ५ महिला संघाचाही सहभाग आहे. (Nashik experienced thrill of super special stage)

तब्बल आठ वर्षानी नाशिकमध्ये रॅली होत असल्याने सर्वांनाच उत्सुकता होती. शुक्रवारी (ता.३१) सकाळपासून सर्व स्पर्धेकांची कागदपत्रे तपासणीबरोबरच त्यांच्या गाड्यांना नंबर देण्यात आले. त्याचप्रमाणे रँलीसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. तसेच वाहनांची तपासणी करण्यात आली. दुपारी चार वाजता ग्रेप सिटी हॉटेलचे संचालक तेजस चव्हाण.

सपकाळ नॉलेज हबचे रवींद्र सपकाळ, शांकी पहाडे आदी मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. रॅलीतील सुपर स्पेशल स्टेजचा प्रेक्षणीय थरार अनुभवण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी महिरावणी, अंजनेरी, त्र्यंबकेश्वर, पहिणे परिसरातील रहिवाशांनी देखील स्पर्धा जवळून पाहण्याचा आनंद घेतला. (latest marathi news)

स्पर्धकांना नाशिकमध्ये येतोय वेगळा अनुभव

सुपर स्टेजच्या स्पर्धेपूर्वी गौरव गील, अर्जुनराव आरुर, अमित्रजीत घोष, हर्किषन वाडिया, प्रगती गौडा, मुसा शेरीफ, करना कदूर, जहासिंह गील या सहभागी रायडर्सनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी नाशिकमध्ये होणाऱ्या रॅलीचा अनुभव विलक्षण असून थोडा ट्रिकी, टफ आणि चॅलेंजिंग असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यासह रॅलीतील दुसरी स्टेज अर्थात बीटा ही गेम चेंजर ठरणारी आहे असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

Nude Party: न्यूड पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; संशयित आयोजकांना अटक

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Latest Marathi News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT