Nashik Garbage truck esakal
नाशिक

नाशिक : घंटागाडीच्या जुन्या ठेकेदारांना मुदतवाढ

विक्रांत मते

नाशिक : पुढील पाच वर्षांसाठी घंटागाडीचा ठेका देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेला विलंब होत असल्याने आता एकाऐवजी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाणार आहे. त्यासाठी शुक्रवारी (ता. १४) स्थायी समितीवर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ४ डिसेंबरला घंटागाडीचा ठेका संपुष्टात आला.

२०१७ मध्ये घंटागाडीचा ठेका पाच वर्षांसाठी विभागनिहाय देण्यात आला. सिडको व पंचवटी विभागातील सेवा ठेकेदाराकडून काढून अन्य ठेकेदारांना काम देण्यात आले. ४ डिसेंबरला पाच वर्षांच्या ठेक्याची मुदत संपुष्टात येत होती. त्यापूर्वी घनकचरा विभागाने प्रस्ताव सादर केला. पूर्वीचा ठेका १७६ कोटी रुपयांना असताना डिझेलच्या किमती वाढल्याचे कारण देत तब्बल अडीच पट म्हणजे ३५४ कोटी रुपयांवर ठेक्याची किंमत पोचविण्यात आली. मागच्या दाराने विषयाला मंजुरी देण्याबरोबरच न्यायालयीन प्रक्रियेमुळे चार डिसेंबर ही अखेरची मुदत उलटून गेल्याने एक महिना म्हणजेच चार जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ४ जानेवारी मुदत संपुष्टात आल्याने पुन्हा एक महिना मुदतवाढीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परंतु वांरवार करार करण्याची प्रक्रिया वेळखाऊपणाची असल्याने तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर सादर केला जाणार आहे. अटी व शर्ती बदलताना घंटागाडीच्या निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देवूनही सातपूर व पंचवटी विभागात प्रतिसाद मिळत नसल्याने सात दिवसांची पुन्हा मुदतवाढ देण्यात आली.

सातपूर व पंचवटी विभागात प्रत्येकी दोन निविदा आल्या तर पूर्व, पश्‍चिम विभागात प्रत्येकी चार तर नाशिक रोड विभागात तीन निविदाधारक आले आहेत. सिडको विभागात सर्वाधिक सहा निविदाधारक आहेत. जुन्या ठेकेदारांना मुदतवाढ देताना सतरा कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. सातपूर विभागासाठी चार कोटी, पूर्व विभागासाठी तीन कोटी, पश्चिम विभागासाठी दोन कोटी, नाशिक रोड, पंचवटी, सिडको या तीन विभागाचे काम एकाच कंत्राटदाराकडे असल्याने तीनही विभागांसाठी एकूण आठ कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT