Wetlands can be seen in the area of ​​highways and railways in Shiwar.
Wetlands can be seen in the area of ​​highways and railways in Shiwar. esakal
नाशिक

Nashik News : उड्डाणपुल, सहापदरीकरणामुळे निचरा थांबणार! जमिनी नापीक झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : इगतपुरीजवळील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व ठिकठिकाणी उड्डाणपुल, सहापदरी महामार्ग आणि समृद्धी महामार्ग अशा अनेक प्रगतशिल कामांमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या जमिनी शासनस्तरावर संपादीत झाल्या आहेत. मात्र, उर्वरीत शेतजमिनी महामार्गालगत असल्याने या भागात पावसाळ्यात होणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी शासनाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात सर्व पाणी शेतकऱ्यांच्या शेतात तुंबून राहणार आहे. (nashik Farmers are worried because land is barren of igatpuri marathi news)

परिसरातील डोंगर, नाले व रेल्वे लाईनमधून येणारे पाण्याचे स्त्रोत परिसरातील शेतीत जमा होईल. गेल्या अनेक वर्षापासून नाली, गटारी, ओहळ, उड्डाणपूल, महामार्ग, रेल्वे आणि समृद्धी महामार्गावरून येणारे पाणी शेतजमिनीत जमा होते. या पाण्यामुळे शेत जमिनी नापीक झाल्याने शेतकऱ्यांवर उपासमार व बेरोजगारीची वेळ आली आहे.

पावसाळी व नैसर्गिक आपत्ती पाहता शासन पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दिवसागणीक वाढत आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी जमिनी विकून पर्यायी सुपीक जमिनी खरेदी केल्या आहेत. सध्या पाणथळी जमिनी विकणे हाच पर्याय शेतकऱ्याकडे राहिल्याने परिसरातील भातपिक कमी झाल्याचे दिसून येत आहे.

शेती करायची कशी?

बोरटेंभे, पिंपरीसदो, नांदगावसदो, फांगुळगव्हाण शिवारासह शहरी महामार्गालगत जमिनी नापिक होत असताना अनेक राजकीय व शेतकरी संघटनांचे यापूर्वी आंदोलने झाली. मात्र, शासनाने पावसाळीसह नैसर्गिक पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणताही उपाय अथवा पर्याय अद्याप न केल्याने तशीच परिस्थिती सध्या आहे. सहापदरी रस्ता सुरू असलेल्या पिंपरीसदो, गिरणारे, टिटोली, बोरटेंभे येथे येणाऱ्या पावसाळ्यात शेती करायची कशी, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे.(latest marathi news)

..तर भातशेतीच होईल नामशेष

महामार्गावरील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी म्हणून रस्त्याची उंची वाढली व उड्डाणपूल झाले. त्यातच सहापदरी रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. शेतकरी मात्र बेरोजगार व भुमिहिन होत असून, जमिन पाणथळ झाली तर ती घेणार कोण? वडिलोपार्जीत जमिनी केवळ शासन अधिग्रहण करून विकास साधत असेल तर येणाऱ्या काळात तालुक्याची भातशेती नामशेष होण्यास वेळ लागणार नाही. भात पिकासाठी प्रसिद्ध असलेला तालुका केवळ नावापुरता उरेल, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

''पाणथळ शेतजमिनीत भात पिकासह इतर लागवडीखालील पिके घेता येत नाही. अनेक वर्षांपासून पाणी साचून जमिन नापिक होत असल्याने जमिनी पडीक आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.''- गणेश गीते, शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : प्रचारसभांमध्ये ‘दोन शहजादे’, ‘मंगळसूत्र’, ‘मच्छी व मटण’, ‘भटकती आत्मा’चा बोलबाला

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Lok Sabha Election: निकालाआधीच राष्ट्रवादीला धक्का! अजित पवार यांच्या जवळच्या उमेदवारावर का दाखल झाला गुन्हा?

T20 World Cup Schedule: ‘टी-20’ वर्ल्ड कपची उत्सुकता शिगेला! अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये रंगणार थरार, पाहा संपूर्ण शेड्युल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT