Tomato plant ready for planting in shednet esakal
नाशिक

Nashik Tomato Crop News : टॉमेटो लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल! कळवण खुर्द सह परिसरात लागवडीला वेग

Nashik News : एकेकाळी ऊस पट्ट्यातील हा परिसर आता टोमॅटो लागवडीत अग्रेसर झाला आहे.

रवींद्र पगार

कळवण : तालुक्यात शेतकऱ्यांकडून टोमॅटोचे उत्पादन घेण्याकडे कल वाढला असून तालुक्यात सुमारे तीनशे ते ३५० हेक्टर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे. एकेकाळी ऊस पट्ट्यातील हा परिसर आता टोमॅटो लागवडीत अग्रेसर झाला आहे. त्यामुळे कळवण खुर्द परिसराची ओळख टोमॅटोचे आगार अशी बनत आहे. (Nashik Farmers trend towards tomato cultivation news)

गतवर्षी उन्हाळी हंगामाच्या अखेरीस टोमॅटोच्या दराने उसळी घेतल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लाखो करोडो रुपयांची कमाई केली. इतर हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात दर चांगला मिळतो म्हणून कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगामात टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

टोमॅटो लागवड म्हणजे एकप्रकारची लॉटरीच आहे. लागली तर लागली नाहीतर संपूर्ण जागेवर पीक सोडून द्यावे लागते. मात्र अशी परिस्थिती असताना देखील तालुक्यातील शेतकऱ्यांना टोमॅटो लागवडीचा अक्षरशः लळा लागला आहे. कळवण खुर्द, कळवण बुद्रूक, पाळे, नाकोडे, देसराणे, बेज, शिरसमणी, मानूर, एकलहरे आदी गावाबरोबरच परिसरात शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेतात.

उत्पादन खर्चात वाढ, दरातील चढ- उतार, गारपीट, अवकाळी, तापमान वाढ, किडीचा प्रादुर्भाव, फूल गळती व वेगवेगळे रोग यासह अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मात्र असे असताना देखील तालुक्यात टोमॅटो लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. ‌‌गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करून टोमॅटोच्या उत्पादनात वाढ केली आहे.

मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, रोगांपासून संरक्षणासाठी चार बाजूंनी जाळी, रोपे जगवण्यासाठी छोटी संरक्षण पाइप, ‌विविध किट, विविध प्रकारच्या फवारण्या, आळवणी तसेच चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची रोपे लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.  (latest marathi news)

टोमॅटो दरावरच सर्वकाही अवलंबून

गतवर्षी उन्हाळी हंगामात सुरवातीला टोमॅटोच्या नीचांकी दरामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. काहींनी प्लांट लवकर काढून टाकल्या. परंतु शेवटी शेवटी टोमॅटो दराने उच्चांक गाठला. त्याचदरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या प्लांट चालू होत्या, ते अक्षरशः करोडपती झाले. याही हंगामात अनेकांनी टोमॅटोची लागवड केली आहे. मात्र यावर्षी टोमॅटोला कसा दर मिळेल यावरच सर्वकाही अवलंबून आहे.

"टोमॅटोची लागवड हे एकप्रकारचे व्यसनच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी टोमॅटोचे उत्पादन घेत आहे. अलीकडच्या कालावधीत अनेक बदल झाले. गेल्या पाच-सहा वर्षांत टोमॅटोच्या दरात देखील खूप चढउतार आले. गतवर्षी हंगामाच्या अखेरीस टोमॅटोच्या दराने उसळी घेतल्यामुळे चांगला फायदा झाला. यावर्षी टोमॅटोला चांगला दर मिळेल."- संदीप पगार, कळवण

"कळवण तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकाची लागवड करून आधुनिक तंत्रज्ञान व विविध उपाययोजना करून दर्जेदार व गुणवत्ता माल तयार करून टोमॅटो मार्केटमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. तालुक्यात यंदा ३०० ते ३५० हेक्टर लागवड झाली असून शेतकरी वर्गाला चांगल्या भावाची अपेक्षा आहे."

- मीनल म्हस्के-पगार, तालुका कृषी अधिकारी, कळवण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT