trimbakeshwar
trimbakeshwar esakal
नाशिक

Nashik Tourism : पर्यटनाचे ‘फेव्हरिट डेस्टिनेशन’ नाशिक

सकाळ वृत्तसेवा

"धार्मिक पर्यटन हा देशाचा आत्मा आहे. धार्मिक क्षेत्र म्हणून झपाट्याने विकसित होत असलेल्या नाशिकला निसर्गाची भरभरून देणगी लाभल्याने वर्षातील ३०० दिवस येथे पर्यटनास वाव आहे. नाशिक म्हटलं, की चटकन डोळ्यासमोर येते ती चवदार मिसळ, द्राक्षे, पंचवटीतील राममंदिर, त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग तसेच सप्तशृंगगडावरील सप्तशृंगी देवीचे अधिष्ठान. या धार्मिक पर्यटनाच्या सोबतीला आता ऐतिहासिक स्थळे, हेल्थ अॅन्ड वेलनेस टुरिझम, कृषी पर्यटन, फिल्म टुरिझम आणि अॅडव्हेंचर टुरिझम यांचाही नव्याने उगम होत आहे. त्यासाठी नाशिकच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी थोडासा पुढाकार घेतल्यास निश्चितपणे नाशिक हे पर्यटनाचे ‘फेव्हरिट डेस्टिनेशन’ व्हायला फारसा वेळ लागणार नाही."- समीर देशमुख, संचालक नेचर टुर्स, नाशिक

(Nashik favorite destination of tourism sakal anniversery special article news)

नाशिकचा पर्यटनाच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास धार्मिक पर्यटन हा आपला पाया आहे. त्याच्याशी निगडित कृषी पर्यटन अर्थात, वाइन टुरिझमचा नवा सक्षम पर्याय निर्माण झाला आहे. ‘वाइन कॅपिटल’ म्हणून नाशिकचा विकास होण्यामागे येथील वातावरण युरोपशी साधर्म्य आहे, हे प्रमुख कारण आहे.

युरोपीय देशांमध्ये सर्वाधिक वायनरी आहेत. तेथील वातावरण आणि नाशिकचे हवामान जवळपास सारखेच असल्यामुळे नाशिकला वाइनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यामुळे धार्मिक पर्यटनाच्या जोडीला ‘वाइन टुरिझम’ हे अलीकडच्या काळात विकसित झालेले पर्यटनाचे क्षेत्र आहे.

नाशिकपासून शिर्डी अवघे ९० किलोमीटरवर आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर येथील बहुतांश भाविक नाशिकहून शिर्डीला जातात तसेच इतर राज्यांतील भाविक शिर्डीला येतात, त्याद्वारे नाशिकच्या तीर्थक्षेत्रांना ते भेटी देत असल्यामुळे धार्मिक पर्यटनाचा विकास जलद गतीने होत आहे.

धार्मिक पर्यटनाचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत असले तरी धार्मिक भावना मात्र त्याच आहेत. त्या बदलत नसल्यामुळे पर्यटनाचे स्वरूप झपाट्याने बदलत असल्याचे आपल्या लक्षात येईल. नाशिकचा अधिक विकास करायचा म्हटले, तर देशातील १२ ज्योतिर्लिंगापैकी घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, भीमाशंकर, परळी वैजनाथ व त्र्यंबकेश्वर हे पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत.

केंद्र सरकारने ठरवले, तर उज्जैन व काशीच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरचा अगदी सहज विकास होऊ शकतो. हा मुद्दा स्थानिक लोकप्रतिनिधींनी पंतप्रधानांपर्यंत पोचवण्याची आवश्यकता आहे. या धार्मिक स्थळांचा विकास झाला, तर देशभरातील लोक महाराष्ट्रात व नाशिकला येतील. त्यातून पर्यटनाला चालना मिळेल.

आपले पूर्वज धार्मिक पर्यटनासाठी घराबाहेर पडत होते. आता त्याची संकल्पना विकसित झाली असून, पर्यटनाला धार्मिक जोड दिली आहे. पर्यटनाच्या विकासात स्थानिक रहिवासी व प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित असते.

त्याशिवाय पर्यटनाची वृद्धी होऊ शकत नाही. २०३० पर्यंत नाशिकचा कायापालट करायचा असेल, तर ‘कृती आराखडा’ अॅक्शन प्लॅन तयार करायला हवा. त्यादृष्टीने प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित केले, तर पर्यटनात नाशिकचे भविष्य उज्ज्वल आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

नाशिकमध्ये दर वर्षी किती भाविक, पर्यटक भेट देतात, याविषयी कुठलिही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यासाठी प्रशासनाने किंवा ‘एमटीडीसी’ने एक पोर्टलद्वारे माहिती संकलित करण्याचे काम केल्यास त्यादृष्टीने नाशिककरांना विकासाचा रोडमॅप तयार करता येईल.

आज कुठल्या राज्यातील, शहरातील पर्यटक येऊन जातो, हे माहितीही होत नाही. अंदाजे आकडे दिले जातात. तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर केल्यास हे अशक्य नाही. हॉटेल, ट्रॅव्हल्स कंपन्यांनी ग्राहकाभिमुख सुविधा द्याव्यात, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होण्याची गरज आहे.

फूड टूरिझम विकसित करताना स्थानिक ताज्या फळांचा रस पर्यटकांसमोर काढून दिल्यास अधिक प्रभावी वाटते, यातून स्थानिक शेतकऱ्यांना थेट फायदा मिळू शकतो. त्यासाठी हवे तेवढे पैसे खर्च करण्याची पर्यटकांची तयारी असते.

भारतातील चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके नाशिक जिल्ह्याचे भव्य जागतिक दर्जाचे बॉलिवूड थीम पार्क का असू नये तसेच फिल्म टूरिझम हा नव्याने विकसित होत असलेला भाग सध्या सर्वांचे लक्ष वेधत आहे. मुंबईला पर्याय म्हणून इगतपुरी व नाशिक तालुक्यातील वातावरणाचा पुरेपूर वापर होऊ शकतो. कलाकारांना आवश्यक पुरेशा सुविधा दिल्यास फिल्म टूरिझम सक्षम पर्याय होऊ शकतो.

योगा, अध्यात्म आणि साहित्य...

योगा आणि अध्यात्माकडे सध्या नागरिकांचा कल वाढला आहे. केरळ राज्याने यादृष्टीने स्वत:ला विकसित केले आहे. नाशिक जिल्ह्याचे वातावरण पोषक आहे, यात महत्त्वाचे म्हणजे इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात अध्यात्माचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते.

यादृष्टीनेच आर्ट ऑफ लिव्हिंगने नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. हेल्थ अॅन्ड वेलनेस टूरिझम म्हणून नाशिकचा विकास होऊ शकतो. त्याचाही विचार प्रामुख्याने व्हायला हवा.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर हा येथील अनमोल ठेवा हे देखील उत्तम प्रकारे पर्यटकांना दाखवता येईल. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट वेस्टर्न घाटचा काही भाग नाशिक जिल्ह्यातून जातो, हे बहुतांश लोकांना माहीत नाही.

त्याचा पुरेपूर वापर आपण करून घेऊ शकतो. अॅडव्हेंचर टूरिझमला या भागात वाव आहे. पावसाळ्यात इगतपुरी व त्र्यंबकेश्वरचे वातावरण लोणावळ्यापेक्षाही विलोभनीय असते. त्यामुळे पर्यटक नाशिकला प्राधान्य देऊ शकतात. त्यांना योग्य प्रकारची वागणूक आणि हॉटेलच्या सुविधा मिळायला हव्यात.

नांदूरमध्यमेश्वरला ‘रामसर साइट’चा दर्जा नुकताच मिळालेला असला तरी पर्यटनाच्यादृष्टीने त्याचा पाहिजे तेवढा वापर करून घेण्यात नाशिककरांना यश आलेले दिसत नाही. पर्यटनाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरतो तो म्हणजे, विमानसेवा. येत्या १५ मार्चपासून नाशिकमधून तीन शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू होत आहे.

परंतु, धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल, अशा पद्धतीची विमानसेवा द्यायली हवी. महाराष्ट्रातील पाचही ज्योतिर्लिंगांना जोडण्यासाठी नाशिक विमानतळ केंद्रस्थानी ठेवल्यास काही दिवसात ज्योतिर्लिंग फिरण्याची संधी भाविकांना मिळेल.

पर्यटनाची वृद्धी होण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता

- वर्षातील ३०० दिवस पर्यटन होईल, अशी नाशिकला निसर्ग संपदा

- फिल्म सिटी उभी राहिल्यास इगतपुरी, नाशिक शहराचा होणार कायापालट

- डाळिंब, पेरूंसह फळांच्या ज्यूस विक्रीतून शेतकऱ्यांना सहकार्य

- फूड टूरिझमचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसिद्धी व्हायला हवी, त्यात नाशिक मिसळ हा ब्रॅन्ड व्हावा.

- हवाई वाहतुकीने महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगाना जोडले जावे

- नांदूरमध्यमेश्वरचा ‘रामसर’मध्ये समावेश झाला, त्याची प्रसिद्धी व्हायला हवी

- पतंजली हरिहरच्या धर्तीवर नाशिकचा विकास व्हायला हवा

- अॅडव्हेंचर टुरिझमला उत्तम प्रतिसाद मिळू शकतो

- हेल्थ अॅन्ड वेलनेस टुरिझम म्हणून नाशिकचा विकास होऊ शकतो

नाशिकमधील पर्यटनस्थळे

- नाशिक शहराभोवती व जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बघण्यासाठी साधारणत: दोन दिवस लागतील

- शिर्डीसह अन्य पयर्टनस्थळी जाणे सोयीचे

- त्र्यंबकेश्वर येथील महादेवाचे मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने त्याचे महात्म देशभर आहे

- त्र्यंबकेश्वरला गेल्यावर ब्रह्मगिरी शिखरावर पर्यटनासाठी जाता येते.

- ब्रह्मगिरी पर्वताला भेट देण्यासाठी येथे गाइडही उपलब्ध असतात

- साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले सप्तशृंगी देवीचे वणी येथील मंदिर

- साल्हेर, मुल्हेर, हरिहर यांसह गड-किल्ल्यांनाही भेट देऊ शकता

- वाइन पर्यटनाचाही नागरिकांना आनंद घेता येईल

- फिल्म टुरिझम ही नवीन संकल्पना उदयास येत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT