Three shops near the sixty foot road behind the bus stand in the city were gutted in the fire that broke out this afternoon.
Three shops near the sixty foot road behind the bus stand in the city were gutted in the fire that broke out this afternoon. esakal
नाशिक

Nashik Fire Accident : सटाण्यात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 3 दुकाने जाळून खाक; 30 लाखांचे नुकसान

रोशन खैरनार

सटाणा : शहरातील बसस्थानकामागील साठ फूटी रस्त्यालगत असलेल्या तीन दुकानांना आज शनिवर (ता.३०) रोजी दुपारी ३.३० वाजता विद्युत मीटरच्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली.

या भीषण आगीत तिन्ही दुकानातील विक्रीसाठी असलेली सर्व वस्तु, मशीनरी, महत्वाचे कागदपत्रे जळून खाक झाले असून जवळपास तीस लाख रुपयांचा माल जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र पालिकेचा अग्निशमन बंब तब्बल तासभर उशिरा पोहोचल्याने आग आटोक्यात आणणे अशक्य झाले. (Nashik Fire Accident 3 shops burnt down in fire caused by short circuit in Satana 30 lakhs loss)

शहरातील बसस्थानकामागील साठ फूटी रस्त्यालगत असलेल्या दैनंदिन भाजीपाला बाजारात अनेक व्यावसायिकांची दुकाने आहेत.

आज दुपारी साडेतीन वाजता नरेश तुकाराम खैरनार यांच्या आकांक्षा फ्रेम मेकर या दुकानातील विद्युत मीटरमध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि शॉर्ट सर्किटमुळे क्षणार्धात आग लागली.

काही कळण्याच्या आतच आगीने रौद्ररूप धारण केले. फ्रेम मेकरचे दुकान असल्याने लाकडी सामान, मशिनरी तसेच संगणक साहित्याला आगीने मोठा पेट घेतला. लगतच त्यांचे गोडाऊन असल्याने आगीचा मोठा भडका उडाला.

परिणामी शेजारील रविंद्र किसन गोसावी यांच्या रवी टेलर व मुन्ना भटू निकम यांच्या शिवशंकर मेन्स पार्लर या दोन्ही दुकानांना सुद्धा आगीने कवेत घेतले. आग लागताच परिसरातील नागरिकांनी पाणी टाकून आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

त्यातच घटनास्थळी पोहोचलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्वलसिंग राजपूत यांच्यासह नागरिकांनी तत्काळ पालिकेच्या अग्निशमन विभागास फोन केला. मात्र अग्निशमन विभागातील कर्मचार्‍यांनी फोन उचलले नाही.

अखेर काही नागरिकांनी स्वत: ताहाराबाद रस्त्यावरील अग्निशमन केंद्रात गाठले आणि कर्मचार्‍यांना घटनास्थळी येण्याची विनंती केली. मात्र अग्निशमन बंबास उशीर झाल्याने आगीमध्ये तिन्ही दुकाने जळून खाक झाली.

सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून नागरिकांच्या सतर्कतेमुळे इतर दुकाने आगीपासून वाचवता आली. घटनेनंतर तहसिलदार कैलास चावडे, तलाठी जयप्रकाश सोनवणे, तलाठी रोशन गौतम, कोतवाल रविंद्र बच्छाव हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या माजी नगरसेविका सुमनताई सोनवणे यांच्यासह दुकानमालक महिलांनी तहसीलदार श्री.चावडे यांच्यासमोर अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि अग्निशमन बंब उशिरा पोहचल्याची तक्रारही केली.

यावेळी तलाठी जयप्रकाश सोनवणे यांनी घटनेचा पंचनामा केला. आगीत नरेश खैरनार यांचे २० लाख ४३ हजार रुपये, रविंद्र गोसावी यांचे ४ लाख ८५ हजार रुपये तर मुन्ना निकम यांचे तीन लाख दोन हजार दोनशे रुपये इतके नुकसान झाले आहे.

तहसीलदार कैलास चावडे यांनी शासनाकडून अधिकाधिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुनील मोरे, शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते शाम बगडाणे, दादू सोनवणे, हेमंत भदाणे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि नुकसानग्रस्तांचे सांत्वन केले.

माजी आमदार संजय चव्हाण यांनी वीज महावितरणच्या अधिकार्‍यांशी फोनवर संपर्क साधत घटनेची माहिती दिली आणि नुकसानग्रस्तांना तत्काळ आर्थिक नुकसानभरपाई मिळवून देण्याची सूचना केली.

यावेळी बापू सोनवणे, विकास देवरे, विकी कापडणीस, तुषार सोनवणे, हिरामण सोनवणे, जयेश चोपडा, निलेश शिरोडे आदींसह नागरिक उपस्थित होते.

अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांची दिरंगाई

आज शहरातील आठवडे बाजार असल्याने साठ फूटी रस्त्यावर दररोज भरणारा दैनंदिन भाजीपाला बाजार शहरातील आरम नदीकिनारी महालक्ष्मी मंदिर परिसरात असल्याने हा परिसर आज मोकळा होता. अन्यथा याठिकाणी दररोज मोठी गर्दी असते.

त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वारंवार फोन करूनही सटाणा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी फोन उचलण्यास दिरंगाई करून येण्यास उशीर केल्याने शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT