Fire breaks out at Vardhaman home wear showroom in Nashik. esakal
नाशिक

Nashik Fire Accident : मेनरोडवर कापड दुकानास आग; लाखो रुपयाचे साहित्य खाक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fire Accident : मेनरोड धुमाळ पॉईंट ते महात्मा गांधी रोड मार्गावरील गृहपयोगी कपड्यांच्या शोरूमला रविवारी रात्री (ता.१२) आग लागली.

आगीत दुकानातील चादर, बेडशीट, उशी, कव्हर, पडदे अशा विविध प्रकारच्या कपड्यांचा साठा जळून खाक झाला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. (Nashik Fire Accident Cloth shop fire on Main Road Lakhs of material)

लक्ष्मीपूजनाच्या रात्री अकराला मेनरोड धुमाळ पॉईंट ते महात्मा गांधी रोड येथील मुंदडा मार्केटला लागून असलेल्या वर्धमान गृहउपयोगी कपड्यांच्या शोरूमला आग लागली. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती दुकान मालक आणि अग्निशामक विभागास दिली.

अवघ्या काही मिनिटात अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. शोरूमचा वरचा भाग जुन्या वाड्याचा असल्याने संपूर्ण लाकडी होता. त्यामुळे आगीने क्षणात रुद्ररूप धारण केले होते.

अग्निशामक मुख्यालय, पंचवटी, सातपूर, सिडको, के के वाघ विभागासह फटाका स्टॉलवर राखीव असलेल्या बाबांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. ५० बंबांच्या सहाय्याने रात्रभर आगेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता.

बहुतांशी आग आटोक्यात आली होती. अडचणीच्या ठिकाणी असलेली आग विझवण्यासाठी सकाळी पुन्हा सुमारे २० बंबांचा वापर करण्यात आला. सोमवारी (ता.१३) दुपारी एकला आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात आले.

यावेळी महापालिका उपायुक्त श्रीकांत पवार, उपायुक्त प्रशांत पाटील, उपायुक्त नितीन नेर, स्वीय सचिव दिलीप काठे घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन मुख्य अधिकारी संजय बैरागी यांच्या मार्गदर्शनात आग विझविण्यात आली.

तेरा तास रस्ता बंद

रविवार रात्रीपासून ते सोमवार दुपारपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू असल्याने सांगली बँक सिग्नल ते धुमाळ पॉईंट पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सुमारे १३ तास रस्ता बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती.

विद्युत पुरवठा खंडित

आगीमुळे शॉर्टसर्किट होऊन अन्य दुकानांना आग लागू नये. यासाठी खबरदारी म्हणून वीज वितरण विभागाकडून संपूर्ण परिसराचा विद्युत पुरवठा खंडित केला होता.

सोमवारी दुपारपर्यंत विद्युत पुरवठा खंडित असल्याने बहुतांशी व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली. अनेकांनी खबरदारी घेत व्यवसाय बंद ठेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT