Youth from Saundane extinguishing the fire. esakal
नाशिक

Nashik Fire Accident : सौंदाणे येथे गढकलिका व्यापारी संकुलास आग

Nashik News : सौंदाणे (ता. मालेगाव) येथील गढकलिका व्यापारी संकुलास सोमवारी (ता. १०) रात्री नऊ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सौंदाणे (ता. मालेगाव) येथील गढकलिका व्यापारी संकुलास सोमवारी (ता. १०) रात्री नऊ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दोन ते तीन दुकाने जळून खाक झाली.आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीत माऊली मोबाईल शॉप हे पूर्णतः जळून खाक झाले आहे. रविवारी (ता.९) झालेल्या पावसामुळे दुपारपासून वीजपुरवठा खंडित झाला होता. (Fire at Gadkalika Commercial Complex in Saundane)

चोवीस तास उलटूनही वीज पुरवठा सुरळीत झाला नसल्याने, महावितरणच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर रात्री वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. व्यापारी संकुलासमोर उपस्थित असलेल्या नागरिकांना आग लागल्याचे प्रथमत: लक्षात आले.

आग आटोक्यात येईपर्यंत प्रविण पवार यांच्या मालकीचे माऊली मोबाईल शॉप व श्रीकांत आहेर यांचे शिवंभु केक शॉप ही दोन दुकाने आगीत भस्मसात झाली. (latest marathi news)

मालेगाव येथील अग्निशमन दलाला पाचारण केल्यामुळे आग आटोक्यात आली. यामध्ये कुठल्याही जीवितहानी झाली नाही.

सौंदाणेतील तरुणांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. व्यापारी संकुल परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: महापालिकेसाठी शिंदे गट सक्रिय, लोकसभा मतदारसंघनिहाय नेत्यांवर जबाबदारी

Kolhapur Youth Clash : स्टेटस्‌वरून खुन्नस, दबा देंगे हर आवाज, जो उंची होगी...; महागडे कपडे, विनानंबर प्लेट दुचाकी..., कोल्हापूर पोलिसांची काय भूमिका?

सॉरी, आम्ही जग सोडतोय! चिठ्ठी लिहून महिलेनं ११ वर्षीय मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी; पती घरातच झोपलेला

Asia Women Hockey: भारत-चीनमध्ये अंतिम फेरीची लढत; आशिया करंडक महिला हॉकी, आज सामना

Nitesh Karale: नितेश कराळे मास्तरांना पवारांच्या भेटीला पोलिस सोडेना, मास्तरांकडून फोनाफोनी सुरू

SCROLL FOR NEXT