Somnath Baba Chal fire esakla
नाशिक

Nashik Fire Accident : आगीत 10 दुकाने खाक! कोट्यवधींचे नुकसान

Nashik : एका बारदाना गोडाऊनला सोमवारी आग लागल्यानंतर सदर आग आजूबाजूच्या दुकान व गोडाऊनला पसरल्याने या आगीत सुमारे नऊ ते दहा दुकाने व गोडाऊन तसेच लाकडी वस्तूंचे असलेले गोडाऊन जळून खाक झाले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : येथील सुभाष रोड परिसरातील एका बारदाना गोडाऊनला सोमवारी (ता.६) आग लागल्यानंतर सदर आग आजूबाजूच्या दुकान व गोडाऊनला पसरल्याने या आगीत सुमारे नऊ ते दहा दुकाने व गोडाऊन तसेच लाकडी वस्तूंचे असलेले गोडाऊन जळून खाक झाले. आगीत सुमारे एक ते दीड कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (Nashik fire broke out at Bardan Godown in Somnath Baba Chal)

सदर आग तब्बल आठ तासानंतर आटोक्यात आणण्यास अग्निशामक दल अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आले. आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज आहे. सकाळी साडेनऊ ते पावणेदहाच्या सुमारास सोमनाथबाबा चाळ या ठिकाणी बारदाना गोडाऊन असून, या गोडाऊनमधील बारदान्याला अचानक आग लागल्याचे आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी आज विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही.

बाजूलाच अग्निशामक दलाचे कार्यालय असून, त्यांना समजताच त्यांनी तातडीने धाव घेतली. आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा सुरू केला, परंतु उन्हामुळे आगीने उग्ररूप धारण केले. सदरची आग आजूबाजूला सर्व पत्र्याचे गोडाऊन व दुकानांमध्ये पसरली. आग विझविण्यासाठी अरुंद रस्ते व अग्निशामक दलाची गाडी जाण्यास अडथळे निर्माण होत होते.

त्यामुळे आग विझविताना कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती. त्याचप्रमाणे पत्र्याचे मोठमोठे गोडाऊन व दुकाने असल्याने आग विझविण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. त्यातच बघ्यांची प्रचंड प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिसांना सदर गर्दी आवरणे त्रासदायक झाले. बंद दुकाने व चारही बाजूने पत्रे असल्यामुळे अखेर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना जेसीबीच्या साह्याने पत्रे तोडून आग विझवावी लागली. (latest marathi news)

महापालिकेच्या पंचवटी, सातपूर, शिंगाडा तलाव, देवळाली कॅम्प, औद्योगिक वसाहत, इंडिया सिक्युरिटी प्रेस या ठिकाणच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. आकाशात आगीच्या धुराचे प्रचंड लोट दिसत असल्याने संपूर्ण नाशिक रोड परिसरातून हे आग नागरिकांना दिसत होती.

आगीत सुपडु खान, अन्वर खान, दिलीप गायकवाड, इस्माईल खान, अकबर खान, सुंदर खान, कृष्णा कुंदे, कलीम पठाण, सुपडू पठाण यांचे बारदान व प्लॅस्टिक बारदान दुकाने, तसेच ललित ठक्कर यांचे जुन्या वस्तू असलेल्या सागवान न लाकडाच्या अनेक वस्तू होत्या. त्याचप्रमाणे बापू उगले यांचे अंबिका इंजिनिअरिंग वर्कशॉप हे सुद्धा होते.

हे गोडाऊन व दुकाने आगीत खाक झाले. तसेच दुचाकी, एक चारचाकी वाहने, कांडप यंत्रे जळून खाक झाले. तब्बल आठ तासानंतर आग आटोक्यात आणण्यास कर्मचाऱ्यांना यश आले. अग्निशामक दलाचे मुख्य ऑफिसर संजय बैरागी, विजय बागूल, अनिल जाधव, रामदास काळे, पी. आर. बोरसे, विजय चव्हाणके, एस. बी. जाधव, पी. बी. परदेशी, पी. आर. लासुरे, के. के. वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

गर्दी पांगविण्यासाठी बळाचा वापर

भररस्त्यावर तसेच नाशिक रोडच्या मध्यभागी सदर आग लागल्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता. अनेक वेळा गर्दीला हटविण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. त्याचप्रमाणे पोलिस व स्थानिक वाद सुद्धा निर्माण झाला. सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके, निरीक्षक नाईकवाडे, शहर वाहतुकीचे वरिष्ठ निरीक्षक दिनकर कदम व सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

Asia Cup 2025 Ind vs Pak : मैदानात उगाच उन्माद! हॅरिस रौफचा माज ICC ने उतरवला... सर्वात मोठी शिक्षा!

Sikandar Shaikh Gets Bail : पैलवान सिकंदर शेखला जामीन, शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात दिलासा; सिकंदरचे वर्तन वाचवलं...

Pune ATS : जुबेरच्या अटकेनंतर साथीदारांनी संशयित पुस्तके व कागदपत्रे जाळली; पोलिस तपासातील माहिती

SCROLL FOR NEXT