V. N. Naik Education Institute withdraws from election on Saturday rush on the last day of application. esakal
नाशिक

V. N. Naik Institution Election : इतिहासात पहिल्‍यांदा चौरंगी लढत! प्रगती, परिवर्तन, क्रांतिवीर विकास, नवऊर्जा पॅनल

Nashik News : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्‍या इतिहासात पहिल्‍यांदाच या वेळी चौरंगी लढत होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्‍या इतिहासात पहिल्‍यांदाच या वेळी चौरंगी लढत होणार आहे. पंढरीनाथ थोरे यांचे क्रांतिवीर विकास, कोंडाजीमामा आव्‍हाड यांचे परिवर्तन, ॲड. तानाजी जायभावे यांचे प्रगती आणि मनोज बुरकुले यांचे नवऊर्जा अशा चार पॅनलसमवेत आठ अपक्ष, असे एकूण १२० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. (V. N. Naik Institution Election)

तत्‍पूर्वी माघारीच्‍या शेवटच्‍या दिवशी शनिवारी (ता. १३) दिवसभरात २३१ उमेदवारांनी माघार घेतली. नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत इच्छुकांची संख्या उदंड असल्‍याने तिहेरी लढत होते की चौरंगी, याकडे सभासदांसह संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून होते. यापूर्वीच तीन पॅनल तयार झालेले असताना चौथ्या पॅनलसाठी चाचपणी सुरू होती.

शनिवारी अखेरच्‍या काही तासांत मनोज बुरकुले यांनी नवऊर्जा पॅनलची नावे सादर करून चौरंगी लढतीवर शिक्‍कामोर्तब केले आहे. संस्‍थेच्‍या यापूर्वीच्‍या निवडणुकांमध्ये शक्‍यतो दुरंगी लढत राहिलेली आहे. काही निवडणुकांत तिरंगी लढत बघायला मिळाली होती. परंतु संस्‍थेच्‍या इतिहासात प्रथमच यंदा चौरंगी लढत होत आहे. त्‍यामुळे ही निवडणूक अटीतटीची होण्याची दाट शक्‍यता निर्माण झालेली आहे.

यंदा प्रथमच श्रीमती बोडके यांनी विश्‍वस्‍तपदासाठी अर्ज दाखल केलेला असून, महिला उमेदवाराने या पदासाठी अर्ज भरणे हीदेखील ऐतिहासिक घटना आहे. शनिवारी माघारीचा अंतिम दिवस असल्‍याने पॅनलमध्ये स्‍थान न मिळालेल्‍या इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. दिवसभरात वेगवेगळ्या पदांसाठीचे तब्‍बल २३१ उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आले. माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर पॅनलची घोषणा व चिन्‍ हवाटपाची प्रक्रिया पार पडली.

२७ ला मतदान, २८ ला मोजणी

प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झालेली असून, आता निवडणुकीत येत्‍या २७ जुलैला सकाळी आठ ते सायंकाळी पाच, या वेळेत सभासद मतदानाचा हक्‍क बजावतील. तर २८ जुलैला मतमोजणी होणार आहे. दरम्‍यान, पॅनलची घोषणा झाल्‍याने आता प्रचाराचा नारळ खऱ्या अर्थाने फुटणार आहे. (latest marathi news)

दिवसभरातील घडामोडी दृष्टिक्षेपात

- समर्थकांसह सभासदांची संस्‍थेच्‍या आवारात मोठी गर्दी

- रिमझिम पावसातही उपस्‍थितांचा उत्‍साह टिकून

- पॅनलची घोषणा करताना समर्थकांकडून टाळ्यांचा कडकडाट

- पॅनलची यादी मिळविताना सभासदांची धडपड

- दावे, प्रतिदाव्‍यांना सुरवात, पॅनलप्रमुखांनी मांडल्‍या भूमिका

...असे आहेत पॅनल

प्रगती पॅनल : ॲड. तानाजी जायभावे (अध्यक्ष), पुंडलिक गिते (उपाध्यक्ष), हेमंत धात्रक (सरचिटणीस), दिगंबर गिते (सहचिटणीस), ृविश्‍वस्‍त- दामोदर मानकर, बबन सानप, रमेश घुगे, नारायण काकड, नामदेव काकड, अशोक नागरे, सदस्‍य- प्रकाश घुगे, माणिक सोनवणे, बाळासाहेब धात्रक, प्रल्‍हाद काकड (नाशिक).

शरद बोडके, राजेश दरगोडे, संजय वाघ (दिंडोरी), पुंजाहरी काळे, बंडूनाना दराडे, सोमनाथ गंभिरे (निफाड), हेमंत नाईक, समाधान गायकवाड, जयंत आव्‍हाड (सिन्नर), संपत वाघ, रमेश वाघ (येवला), त्र्यंबक डोंगरे, किशोर लहाने (नांदगाव). नंदा भाबड, रेखा कातकाडे (महिला प्रतिनिधी).

परिवर्तन पॅनल : कोंडाजीमामा आव्‍हाड (अध्यक्ष), उदय घुगे (उपाध्यक्ष), बाळासाहेब सानप (सरचिटणीस), ॲड. जयंत सानप (सहचिटणीस), विश्‍वस्‍त- लक्ष्मण जायभावे, डॉ. धर्माजी बोडके, बाळासाहेब वाघ, बाळासाहेब चकोर, नारायण पालवे, रामनाथ सानप. कार्यकारिणी सदस्‍य- गोकुळ काकड, भाऊसाहेब गिते, प्रकाश नागरे.

बबनराव कांगणे (नाशिक), काशीनाथ सानप, किरण गिते, भाऊसाहेब सांगळे (सिन्नर). सुभाष आव्‍हाड, भगवंत चकोर, बापू दरगोडे (दिंडोरी). रामनाथ नागरे, विश्‍वास सानप, उद्धव कुटे (निफाड), महेश आव्‍हाड, रमेश वाघ (येवला). निळकंठ सानप, प्रकाश उगले (नांदगाव). म्‍हाळसाबाई सोनवणे, रंजना सांगळे (महिला सदस्‍य).

क्रांतिवीर विकास पॅनल : पंढरीनाथ थोरे (अध्यक्ष), कमलेश बोडके (उपाध्यक्ष), शिवाजी मानकर (सरचिटणीस), एकनाथ दिघोळे (सहचिटणीस), विश्‍वस्‍त- भास्‍कर सोनवणे, दिलास आंधळे, बुधाजी पानसरे, विठोवा फडे, सुभाष कराड, उत्तम बोडके, कार्यकारिणी सदस्‍य- विलास आव्‍हाड, प्रशांत आव्‍हाड, सुरेश घुगे.

धोंडिराम आव्‍हाड (नाशिक). भगीरथ गिते, गोविंद नागरे, रामनाथ सानप (निफाड). एकनाथ आव्‍हाड, रामनाथ बोडके, अमृतराव सांगळे (सिन्नर), श्याम बोडके, साहेबराव ढाकणे, गोपीनाथ बोडके (दिंडोरी), रामभाऊ केदार, वाल्‍मीक बोडके (येवला). संजय सांगळे, राजाराम बुरकुल (नांदगाव), छाया बुरकुल, मंगला गंभिरे (महिला प्रतिनिधी).

नवऊर्जा पॅनल : मनोज बुरकुले (अध्यक्ष), जयसिंह सांगळे (उपाध्यक्ष), अभिजित दिघोळे (सरचिटणीस), संदीप फड (सहचिटणीस), विश्‍वस्‍त- निवृत्ती बोधले, अरुण भाबड, ज्ञानेश्वर सोनवणे, विष्णू नागरे, नीलेश ताडगे, शोभा बोडके. कार्यकारिणी सदस्‍य- मनोहर काळे.

अजित ताडगे, प्रकाश चकोर, मिलिंद गिते (नाशिक), सूर्यभान कातकाडे, शंकर ढाकणे, रमेश आव्हाड (सिन्नर), रमेश काळे (निफाड), रवींद्र सानप, नाना चांदवडे (नांदगाव), तुळशीराम विंचू, विजय सानप (येवला), विमल दराडे, संगीता धात्रक (महिला प्रतिनिधी).

"निवडणुकीतील उमेदवार आणि सभासद यांनी निकोप व पोषक वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. निवडणूक रिंगणात असलेल्‍या उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. मतदानाच्‍या दिवशी अधिकाधिक सभासदांनी मतदानाचा हक्‍क बजावावा." - ॲड. जालिंदर ताडगे, अध्यक्ष, निवडणूक मंडळ

अध्यक्षपदाचे उमेदवार म्‍हणाले...

कोंडाजीमामा आव्‍हाड : नवीन व युवा चेहऱ्यांना संधी दिली असून, सर्वसमावेशक पॅनल तयार केलेले आहे. काळाराम मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढविला जाईल. सर्व उमेदवार विजयासाठी परिश्रम घेतील.

पंढरीनाथ थरे : गेल्‍या पाच वर्षांमध्ये संस्‍थेचा सर्वतोपरी विकासावर भर राहिला आहे. राहिलेला अनुशेष भरून काढण्यावर भविष्यात भर असेल. अनुभवी, प्रशासकीय, अभियंते, विधिज्ञ, तसेच शहरी-ग्रामीण भागांचा समन्‍वय साधणारा पॅनल आहे.

ॲड. तानाजी जायभावे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्‍या दृष्टिकोनातून संस्‍थेची वाटचाल करणे महत्त्वाचे राहील. अन्‍यथा भविष्यात कमकुवत संस्‍थांचे इतर शैक्षणिक संस्‍थांमध्ये विलीनीकरण होईल. त्‍यामुळे सुशिक्षित, शिक्षणाची जाण असलेले उमेदवार पॅनलमध्ये समाविष्ट केले.

मनोज बुरकुले : संस्‍थेमध्ये विस्‍थापित सभासद, समाजाला न्‍याय मिळावा, या भावनेने पॅनल निवडणूक लढवत आहे. थोरांचे आशीर्वाद, प्रेरणेने पॅनल पुढे नेण्याचे ठरविले आहे. वर्षानुवर्षे संस्‍थेत पद भोगत असलेल्‍यांना टाळून युवकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्‍न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT