Harishchandra Chavan esakal
नाशिक

SAKAL Special : चालता- बोलता! साहेब, आता थांबायचे नाय...

SAKAL Special : दिंडोरी मतदारसंघातून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल करीत, समर्थक व कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांच्याशी संवाद साधला.

सकाळ वृत्तसेवा

साहेब, आता थांबायचे नाय...

लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. महायुती व महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केल्यावर दोन्ही मतदारसंघांतील इच्छुकांचा हिरमोड झाला.

यातील काही इच्छुकांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निश्चिय करीत अर्ज दाखल केला आहे. दिंडोरी मतदारसंघातून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल करीत, समर्थक व कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांच्याशी संवाद साधला.

यात समर्थकांनी साहेबांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली. काही समर्थकांनी तर, ‘काही झाले तरी, कितीही दबाब आला अन कोणीही चर्चा केली, तरी आता साहेब, थांबायचे नाय, लढायचं. नाही तर तुम्ही माघार घेऊन आमची अडचण करू नका,’ असे सांगितले.

(SAKAL Special Chalta Bolta Former MP Harishchandra Chavan filed nomination form from Dindori Constituency)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT