Women and Child Welfare Committee esakal
नाशिक

Nashik News :...अन्यथा चौघींचे होणार पुनर्वसन; अनाथ सापडलेल्या बालिकांच्या पालकांना आवाहन

Nashik : महिला व बालकल्याण समितीच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत बालगृहामध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके दाखल केली जातात.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महिला व बालकल्याण समितीच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत बालगृहामध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके दाखल केली जातात. सदर बालकांची ओळख पटवून संपर्क साधण्याचे आवाहन सदस्य सचिव जिल्हा बाल संरक्षण कक्ष तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने यांनी केले आहे. दिया (वय ४) ही बालिका २९ एप्रिल २०२४ ला लासलगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लासलगाव स्टेशनलगत चांदवड रोडला पानटपरीच्या बाजूला आढळून आली होती. (nashik four girl will be rehabilitated Appeal to parents of orphan girls )

या बालिकेस जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करून ३० एप्रिलला बालकल्याण समितीच्या आदेशान्वये बालिकांचा आधाराश्रम, घारपुरे घाट या संस्थेत दाखल केले आहे. ईशा राजेश उर्फ रोशनी कमलेश वरघडे (वय १५) ही २६ सप्टेंबर २०२१ ला भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळून आली होती. संबंधित बालिकेस बालकल्याण समितीच्या आदेशान्वये मुलींचे निरीक्षणगृह/बालगृह उंटवाडी रोड, नाशिक संस्थेत दाखल करण्यात आले आहे.

अबोली (वय १७) ही दिव्यांग (मूकबधिर) बालिका १२ ऑगस्ट २०२१ ला इगतपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनुसया मतिमंद विद्यालयाच्या बाहेर आढळून आली. बालिकेस बालकल्याण समितीच्या आदेशान्वये मुलींचे निरीक्षणगृह/बालगृह, उंटवाडी रोड, नाशिक संस्थेत दाखल करण्यात आले आहे. (latest marathi news)

तर, ज्योती काशीनाथ वाघ (वय १५) ही मूकबधिर बालिका २१ सप्टेंबर २०२३ ला देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत भगूर येथील आठवडेबाजारात आढळून आली. बालिकेस बालकल्याण समितीच्या आदेशान्वये मुलींचे निरीक्षणगृह/बालगृह, उंटवाडी रोड, नाशिक संस्थेत दाखल करण्यात आले आहे.

...येथे साधावा संपर्क

संबंधित चारही बालिकांच्या भविष्याचा विचार करता दिया हिच्या पालकांनी आधाराश्रम संस्था, घारपुरे घाट येथे ०२५३ -२५८०३०९,२९५०३०९ या दूरध्वनी क्रमांकावर आणि ईशा, अबोली व ज्योती यांच्या पालकांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष नाशिक, समाजकल्याण आवार, नाशिक-पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक- ०२५३-२२३६३६८ या ठिकाणी संपर्क साधावा.

...अन्यथा पुनर्वसन

माहिती प्रसारणाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत बालकांचा दावा करण्यास कोणी आले नाही, तर बालकांना पालक नसल्याचे गृहीत धरून पुढील पुनर्वसनाचा विचार करण्यात येणार असल्याचेही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

SCROLL FOR NEXT