Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : नोकरीच्या आमिषाने 7 जणांची फसवणूक; 27 लाखांना गंडविले; निमगव्हाणच्या एकाविरोधात गुन्हा

Crime News : संशयित अनिल दरेकर (रा. निमगव्हाण) याच्याविरधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे

सकाळ वृत्तसेवा

सोग्रस : भारतीय रेल्वे व नाशिक महापालिकेत नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून चांदवड तालुक्यातील सात तरुणांची २७ लाख पाच हजार ७०४ रुपयांच्या फसवणुकीची घटना नुकतीच उघडकीस आली. संशयित अनिल दरेकर (रा. निमगव्हाण) याच्याविरधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. (Nashik Fraud Crime 7 persons cheated with lure of job news)

याप्रकरणी चांदवड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. कळमदरे (ता. चांदवड) येथील देवीदास सुखदेव जाधव यांच्या फिर्यादीनुसार अनिल मधुकर दरेकर (रा. निमगव्हाण, ता. चांदवड) यांनी फिर्यादी व साक्षीदारांना भारतीय रेल्वे व नाशिक महापालिकेत नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला.

त्यांच्याकडून वेळोवेळी नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन २२ लाख पाच हजार ७०४ व पाच लाख रुपयांची रोकड असे एकूण २७ लाख पाच हजार ७०४ रुपये घेतले. संबंधितांनी नोकरीबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना संशय आला. (latest marathi news)

त्यानंतर फिर्यादींनी त्याच्याकडे नोकरी लावून दे, अन्यथा पैसे परत कर, असा तगादा लावला. मात्र अनिल दरेकरने पैसे देणे दूरच, उलट संबंधितांना फोनवरून शिवीगाळ व धमकी दिल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी चांदवड पोलिसांत अनिल दरेकरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. चांदवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT