Fraud Crime  esakal
नाशिक

Nashik Fraud Crime: उपचाराचा खर्च शासनाकडून मिळवून देण्याचे आमिष; सिन्नरला महिलेविरोधात 53 हजाराच्या फसवणुकीचा गुन्हा

Nashik Fraud Crime : मृत झालेल्या मुलाच्या उपचाराचे बिल शासनाकडून काढून देते, शासकीय घरकुल योजनेचा लाभ मिळवून देते, असे सांगत एका महिलेकडून तीन टप्प्यात ५३ हजार रुपये घेतले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत झालेल्या मुलाच्या उपचाराचे बिल शासनाकडून काढून देते, शासकीय घरकुल योजनेचा लाभ मिळवून देते, असे सांगत एका महिलेकडून तीन टप्प्यात ५३ हजार रुपये घेतले. मात्र, सांगितलेली काम न करता फसवणूक केल्याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात एका महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मीना प्रकाश जाधव (रा. नवी मुंबई), असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. (Nashik Fraud crime lure of getting treatment expenses from government)

सौ. जाधव यांची बहीण व सून सिन्नर येथे राहतात. त्यांच्याशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत सिन्नरच्या विजयनगर भागात राहणाऱ्या सोनाली भूषण पाटील नामक महिलेने तुमचे दवाखान्यात मुलाच्या उपचारासाठी खर्च झालेले पैसे शासनाकडून परत मिळवून देते, असे सांगितले. त्यासाठीचा खर्च म्हणून २० हजार रुपये घेतले.

त्याचप्रमाणे तुम्हाला शासकीय योजनेतून घर मंजूर करून देते, असे सांगत पुन्हा दोन टप्प्यात पहिल्यांदा १६ हजार रुपये आणि दुसऱ्यांदा १७ हजार रुपये घेतले. १० डिसेंबर २०२३ ते २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत सोनाली पाटील या महिलेने मीना जाधव यांच्याकडून सिन्नरच्या विजयनगर येथील ती राहत असलेल्या घरात रकमा रोख स्वरूपात स्वीकारल्या.(latest marathi news)

या वेळी जाधव यांची बहीण, तिची सून, मुलगा साक्षीदार होते. मागितल्याप्रमाणे पैसे देऊनही सोनाली पाटील हिने सांगितलेली कामे केली नाहीत. कामे होत नाही, तर पैसे परत दे, असे सांगितल्यावर तिने उडवाउडवीची उत्तरे दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. सिन्नर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस नाईक हरीश आव्हाड तपास करीत आहेत.

सोनाली पाटील नामक महिला सिन्नरच्या विजयनगर भागात वास्तव्यास आहे. तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ती राहत असलेल्या ठिकाणी जात नोटीस बजावली. तिच्याकडे अधिकृत ओळखीचा कोणताही पुरावा मिळून आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेल्या सहा ते सात महिन्यांपासून ती भाडोत्री घर घेऊन राहत आहे. तिला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI BR Gavai : "मी बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..."; निवृत्तीपूर्वी बीआर गवई काय म्हणाले? बाबासाहेबांचे मानले आभार, सर्वजण स्तब्ध!

जिला कधी अपमानित केलं… तीच ठरली जगाची राणी! मेक्सिकोची फातिमा बॉश मिस यूनिव्हर्स विजेती; भारताची मनिका ‘या’ क्रमांकावर

MP Nilesh Lanke: गड, किल्ल्यांसाठी विशेष निधी द्यावा: खासदार नीलेश लंके; महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन, संवर्धन गरजेचं..

Australian Open Badminton 2025: लक्ष्य, आयुष उपांत्यपूर्व फेरीत; ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन, सात्त्विक-चिराग जोडीचीही वाटचाल

Latest Marathi News Live Update : किनवट नगरपालिका निवडणूकीत भाजप आणि ठाकरे सेनेत थेट लढत

SCROLL FOR NEXT