Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : पोलिस असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाला सव्वा लाखाचा गंडा

Nashik News : इंदिरानगर भागात दोन ज्येष्ठ नागरिकांकडून सुमारे एक लाख तीस हजार रुपये किमतीचे सोन्याची चैन व अंगठी हात चलाखीने चोरून नेल्याची घटना उघडकीस आलेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पोलिस असल्याची बतावणी करत संशयितांनी सांगत सिडको व इंदिरानगर भागात दोन ज्येष्ठ नागरिकांकडून सुमारे एक लाख तीस हजार रुपये किमतीचे सोन्याची चैन व अंगठी हात चलाखीने चोरून नेल्याची घटना उघडकीस आलेली आहे. याप्रकरणी अंबड व इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सुभाष नारायण उपासनी (वय ८३, रा. गणराज कॉलनी, इंदिरानगर) हे रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी आम्ही पोलिस असल्याचे सांगत त्यांचा विश्‍वास संपादित करत त्यांच्या ताब्यातील सोन्याची चैन व अंगठी रुमालात फिर्यादी उपासनी यांना गुंडाळून ठेवण्यास सांगितली.

यावेळी भामट्यांनी उपासनी यांचे लक्ष विचलित करत हात चलाखीने ७० हजार रुपये किमतीचे सोन्याची चैन व अंगठी चोरली.(latest marathi news)

दुसऱ्या घटनेत कामटवाडे या परिसरात राहणारे माणिक दगडू पगारे हे सकाळी दहाला मयूर हॉस्पिटल येथून रस्त्याने पायी जात असताना दोन वेगवेगळ्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात संशयितांनी पोलिस असल्याची बतावणी करत.

फिर्यादी पगारे यांना गळ्यात असलेली सोन्याची चैन व अंगठी काढून रुमालात बांधून ठेवा असे म्हणत संशयित आरोपी यांनी हात चलाखीने त्यांच्याकडील साठ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन व अंगठी चोरून नेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT