Mazi Ladki Bahin Yojana sakal
नाशिक

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहिण’च्या श्रेयासाठी भावी नगरसेवकांची धावपळ

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. या योजनेसंदर्भात शासन स्तरावर जनजागृती केली जात आहे.

जलील शेख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. या योजनेसंदर्भात शासन स्तरावर जनजागृती केली जात आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना व्हावा, यासाठी शहरातील आजी-माजी आमदार व निवडणुकीस इच्छूक असलेल्या उमेदवारांतर्फे महिलांना मार्गदर्शन केले जात आहे. तसेच शहरात काही ठिकाणी कागदपत्रे व फॉर्म भरुन देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. (Future corporates help for Ladki Bahin yojana )

आगामी विधानसभा व महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक इच्छूक उमेदवारांनी आतापासूनच कंबर कसली आहे. शासनाने लाडकी बहिण योजना सुरु केल्यामुळे अनेक इच्छूक उमेदवारांचा थेट नागरीकांशी संपर्क वाढला आहे. अनेक भावी नगरसेवकांनी स्वतंत्र कार्यालय सुरु करुन महिलांना फॉर्म भरण्यासाठी मदत केली जात आहे.

शहरातील पूर्व भागात असंख्य महिलांना अशिक्षित असल्याने कागदपत्रांसाठी जुळविण्यासाठी महिला भगिनी भावी नगरसेवकांची मदत घेत आहेत. या योजनेमुळे आजी-माजी नगरसेवकांमध्ये स्पर्धा लागली आहे. ठिकठिकाणी उर्दूमध्ये बॅनर झळकतांना दिसत आहे. या योजनेमुळे काही ठिकाणी खासगी दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. (latest marathi news)

येथे सुरु आहे मदतकेंद्र

येथील जुना आग्रा महामार्ग, कुसुंबा रोड, अमन चौक, म्हाळदे शिवार, दरेगाव, कॅम्प, संगमेश्‍वर, सटाणा नाका, सोयगाव, गवळी वाडा, मोसम पुल यासह अनेक ठिकाणी, शहरातील राजकीय पक्षांच्या कार्यालयात महिलांना लाडकी बहिण योजनेसंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. या ठिकाणी विनामुल्य महिलांना फॉर्म भरुन दिले जातात. तसेच, कागदपत्रांसाठी मदत केली जात आहे. त्यामुळे असंख्य महिला राजकीय कार्यालयात सकाळपासून ते रात्रीपर्यंत गर्दी करीत आहेत. एकाच ठिकाणी सर्व कुटुंबियांचे फार्म भरुन दिले जात असल्याने दिवसभर महिला फॉर्म भरुन घेण्यासाठी उपस्थित राहत आहेत.

''आझादनगर भागात महिलांना फॉर्म भरुन देण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरु केले आहे. यासाठी महिलांना दिवसभर मदत केली जात आहे. यामुळे खासगी दलालांचा सुळसुळाट कमी झाला आहे. तसेच, त्या-त्या वॉर्डातील ग्रुपमध्ये फॉर्म भरण्यासंदर्भात माहिती दिली जात आहे.''- शेख सिकंदर पहिलवान, सामाजिक कार्यकर्ते, आझादनगर, मालेगाव

''लाडकी बहिण योजनेसाठी संगमेश्‍वर भागात जाऊन जनजागृती केली आहे. महिलांना पुर्णपणे माहिती देवून फाॅर्म कशापध्दतीने भरावा या संदर्भात मार्गदर्शन केले जात आहे.''- संजय घोडके, संचालक, मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT