ganeshotsav esakal
नाशिक

नाशिक : गणेश मंडळांना परवानगीसाठी करता येणार ऑनलाइन अर्ज

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : गणेश मंडळांना परवानगी देण्यासाठी महापालिकेने ऑनलाइन प्रणाली सुरू केली आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर अर्ज करण्याची व्यवस्था उपलब्ध केली आहे. अर्ज करताना अर्जासोबत आधार कार्ड, हमीपत्र आणि जागेचा नकाशा जोडणे बंधनकारक आहे. महापालिकेतर्फे पडताळणी करून परवानगी दिली जाणार आहे. मंडळांनी तत्काळ आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले.


गणेश मंडळांची महापालिकेच्या मेनरोड येथील पूर्व विभाग कार्यालयात गुरुवार (ता. १८) दुपारी चारच्या सुमारास विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. कोणत्याही मंडळाने विनापरवानगी उत्सव साजरा करू नये, तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. महापालिकेने दिलेल्या परवानगीचे पत्र मंडळाच्या सभा मंडपाच्या दर्शनी भागात लावावे. महसूल विभागाच्या पथकांकडून तपासणी करण्यात येणार आहे. या वेळी परवानगी पत्र लावलेले नसेल तर संबधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

मंडळांनी अखेरच्या दिवशी गर्दी न करता आताच प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन श्री. नेर यांनी केले. या वेळी भद्रकाली पोलिस ठाण्याचे दत्ता पवार, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहकले, दिनकर कदम यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस महापालिकेचे अन्य विभागाचे अधिकारी, पोलिस कर्मचारी राजू जाधव, ललित केदारे, सतीश धनगर, अग्निशामक विभागाचे अधिकाऱ्यांसह गणेश मंडळाचे किरण खैरे, प्रसाद डोईफोडे, आदींसह मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: ना सरकारी दौरा..ना खासगी! अमित शाह 20 वर्षांपासून परदेशात गेलेच नाहीत; कारण काय?

Manchar Nagarpanchayat : नगराध्यक्ष पदासाठी सहा जण; १६ जागांसाठी तब्बल ६७ उमेदवार रिंगणात; राष्ट्रवादीला पहिले यश!

Pune Municipal Election : मतदार यादी मिळेना, इच्छुकांचे टेंशन वाढले

Pimpalgaon Ghode Leopard : पिंपळगाव घोडे येथे हल्लेखोर नर बिबट्या वनविभागाच्या पथकाच्या ताब्यात!

IND A vs BAN A: तणाव, थरार अन् शेवटी पराभव... एक ओव्हरनं चित्र बदललं; आशिया कप रायझिंग स्टार्समध्ये 'भारत अ'चं स्वप्न भंगलं

SCROLL FOR NEXT