Girish Mahajan esakal
नाशिक

Girish Mahajan : महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या : गिरीश महाजन

Girish Mahajan : चारशे पार उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पक्षाकडून जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

Girish Mahajan : भारतीय जनता पक्षाचा नाशिक हा बालेकिल्ला असून, चारशे पार उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पक्षाकडून जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केले. नाशिक लोकसभेच्या जागेसाठी आग्रह धरणाऱ्या भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना हा एकप्रकारे इशारा मानला जात आहे. नाशिक लोकसभा क्लस्टरच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात झाली. (nashik Girish Mahajan statement of Election Mahayuti candidate )

या वेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन बोलत होते. ते म्हणाले, भाजपची संघटना पातळीवर मोठी ताकद आहे. त्यामुळे या यंत्रणेच्या माध्यमातून निवडणुका जिंकणे भाजप व महायुतीला अशक्य नाही; परंतु त्यासाठी कार्यकर्त्यांनी वेळ द्यावा. नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला असून, जो उमेदवार महायुतीकडून जाहीर होईल त्याला निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.

‘चारसो पार’ हे भाजपचे उद्दिष्ट आहे, ते उद्दिष्ट कुठल्याही परिस्थितीत गाठले गेले पाहिजे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, सरकारच्या विकासाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचवावे. आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी मतदारसंघातील पक्ष संघटना रचनांचा व विविध विकासकामांचा आढावा सादर केला. (latest marathi news)

डॉ. राहुल आहेर, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, जिल्हाध्यक्ष शंकर वाघ, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, नाशिक लोकसभा निवडणूकप्रमुख केदा आहेर, भाजप ज्येष्ठ नेते विजय साने, सरचिटणीस ॲड. श्याम बडोदे, रोहिणी नायडू, सुनील केदार, यतीन कदम, नाशिक लोकसभा समन्वयक गिरीश पालवे, जिल्हा सरचिटणीस एन. डी. गावित, संजय सानप आदी उपस्थित होते.

विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक

नाशिक लोकसभा क्लस्टरचे प्रमुख व महसूलमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, लाभार्थी संपर्क अभियान प्रभावीपणे राबवावे. हे अभियान प्रभावीपणे राबविल्यास महायुतीचा उमेदवार कोणीही पराभूत करू शकणार नाही. दुसऱ्याच्या तक्रारी करून अथवा उणे-दुणे काढून निवडणुका जिंकण्याचे दिवस संपले आहे. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या व पक्षाच्या विकासाची भूमिका लोकांपर्यंत पोचवावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

Mira-Bhayandar: तो हिंदी भाषिक व्यापारी नडला म्हणून मनसे कार्यकर्ता भिडला, 'त्या' व्हायरल व्हिडिओमागची स्टोरी काय?

SCROLL FOR NEXT