leopard esakal
नाशिक

Nashik Leopard News : नांदूर शिंगोटे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार; शेतकऱ्यांच्या पशुधनावर होताय दररोज हल्ले

Nashik News : शेतकऱ्यांच्या पशुधनावर दररोज हल्ले होण्याचे प्रकार सुरू असून वनविभागाने याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदूर शिंगोटे : नांदूर शिंगोटे व परिसरामध्ये गेल्या आठ दिवसापासून शेतकऱ्यांच्या पशुधनावर दररोज हल्ले होण्याचे प्रकार सुरू असून वनविभागाने याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (Goat killed in leopard attack at Nandur Shingote)

रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तरश्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या योगेश शेळके यांच्या वस्तीनजीक त्यांचा मेंढ्या व शेळ्यांचा कळप वळण्याचे काम सुरू असताना अचानकपणे झाडांमधून बिबट्याने येऊन शेळीला पळवून नेऊन ठार केले.

हा प्रकार मेंढपाळाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आढाव रोड केल्यानंतर बिबट्या शेळी घेऊन फरार झाला. त्याचप्रमाणे चार ते पाच दिवसांपूर्वी त्यांचे बंधू शिवाजी शेळके यांच्याही गाय व कुत्र्यावर बिबट्याने रात्रीच्या सुमारास हल्ला केला होता. मात्र सुदैवाने त्यामध्ये दोन्ही जखमी झाले मात्र बिबट्या पळून जाण्यात यशस्वी झाला.

त्याच वेळी रात्री तीन वाजता योगेश शेळके यांच्या वस्तीवर बिबट्याने पुन्हा कुत्र्यावर हल्ला केला. अशा प्रकारचा या परिसरामध्ये बिबट्याचा हल्ला सुरूच आहे. दोन दिवसापूर्वी सानप वस्तीवर दत्ता सानप यांची गाईचे वासरू व त्या अगोदर दोन दिवस सुधीर शेळके यांच्या गाईचे वासरू बिबट्याने ठार केले होते. (latest marathi news)

हा प्रकार दररोज कुठे ना कुठे पहावयास मिळत आहे, पण आज भरदिवसा बिबट्याने या ठिकाणी कळपावर हल्ला केल्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णत: घाबरलेला आहे. सदरच्या डोंगर पायथ्याशी वन विभागाने पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी यापूर्वीही केलेली आहे.

मात्र वन विभागाने या ठिकाणी पाहिजे त्याप्रमाणे लक्ष दिलेले नसल्याची बाब शेतकरी वर्गाने सांगितली असून दोन दिवसांमध्ये या ठिकाणी पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा व योगेश शेळके यांच्या झालेल्या शेळीचे दहा हजार रुपये इतके नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दररोज बिबट्या भाग बदलून आपला हल्ला शेतकऱ्यांच्या पशु धनावर करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून दोन दिवसात पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे. मात्र बिबट्याचे वाढते हल्ले लक्षात घेऊन दिवसा शेतकरी वर्गाला शेतीची कामे करण्यासाठी सुद्धा भीती निर्माण झाली असल्यामुळे शेतकरी वर्ग शेतावर जाण्यास तयार नाही, तेव्हा या ठिकाणी पिंजरा लावून त्वरित बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

SCROLL FOR NEXT