Interesting reels of 'Ladki Baheen' scheme going viral on social media. esakal
नाशिक

Lek Ladaki Yojana : ‘दादा लाडका दाजीले बी काहीतरी द्या’; ‘लाडकी बहिण’ वरून सोशल मीडियात रंजक रिल्स

Nashik : इन्स्टाग्रामवर, फेसबुकवर पोस्ट टाकणं, व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस बदलणं, मेसेजेस पाठवणं आणि त्यांवरील रिप्लाय, लाईक्स, कमेंटस् बघणं, त्यासाठी वेळ खर्ची घालणं, ही आज असंख्य तरुण-तरुणींची दिनचर्या झाली आहे.

किरण सूर्यवंशी

अभोणा : सध्या सोशल मीडियात मनोरंजनासाठी रिल्स तयार करून शेअर करण्याची वेगळीच क्रेझ आहे. इन्स्टाग्रामवर, फेसबुकवर पोस्ट टाकणं, व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस बदलणं, मेसेजेस पाठवणं आणि त्यांवरील रिप्लाय, लाईक्स, कमेंटस् बघणं, त्यासाठी वेळ खर्ची घालणं, ही आज असंख्य तरुण-तरुणींची दिनचर्या झाली आहे. (Lek Ladaki Yojana)

यात शासनाने ‘माझी लाडकी बहीण’ ही योजना जाहीर केली. यामुळे नेटकऱ्यांना मनोरंजक रिल्स तयार करण्याची चांगलीच संधी मिळाली. अहिराणी भाषेत काहींनी ‘दादा लाडका दाजीले बी काहीतरी द्या’ अशा रिल्स तयार केल्यात तर काहींनी विनोदाने ‘शेतकरीले पाचशे रुपया महिना, अन बायकोले पंधराशे रुपया, शेती करू का दुसरी बायको करू काही समजत नही’.

दुसऱ्याने ‘नकोरे बाबा आता बायको मुख्यमंत्रीनी बहीण शे बरं, जर तरास दिधा, तर जेलमाच जाशी भो’. एकाने लांबच लांब रांगेचे शूटिंग घेऊन, ‘मतदानले काबर एव्हढी रांग लावतं नहीत’ असा प्रश्न केलाय. तर एका बालकाने ‘वा रे सरकार.

स्त्री-पुरुष समानता अन योजना फक्त महिलांसाठीच बस प्रवास निम्मी भाड्यात, आता पंधराशे रुपये, आम्ही लाडके नाहीत का, आम्ही काय गुगलवरून डाउनलोड व्हयेल आहोत का?’ अशा मनोरंजक रिल्स सोशल मीडियात सर्वत्र व्हायरल केल्या आहेत. (latest marathi news)

कोणत्याही म्हणजे अगदी शब्दशः कोणत्याही प्रसंगाचे छोटे-छोटे व्हिडिओ बनवून त्या रिल्स आपल्या खात्यावर अपलोड करायच्या आणि आपल्याशी जोडलेल्यांच्या प्रतिक्रियांमध्ये रमून जायचे हा आज बहुतांश जणांचा ‘उद्योग’ बनला आहे.

यामध्ये ज्यांचे लाखोंनी फॉलोअर्स आहेत, त्यांना तर या माध्यमातून कमाईच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. ग्रामीण भागात रिल्सच्या माध्यमातून ‘लाडक्या बहिणीची’ सर्वत्र चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

SCROLL FOR NEXT