Lok Sabha Constituency esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : नाशिक शिवसेनेकडेच! पालकमंत्री दादा भुसे

Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा भिजत पडलेले असताना, आजअखेर त्यावर सकारात्मक तोडगा निघाला असल्याचे सूतोवाच खुद्द पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.

सकाळ वृतसेवा

नाशिक : गेल्या कित्येक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा भिजत पडलेले असताना, आजअखेर त्यावर सकारात्मक तोडगा निघाला असल्याचे सूतोवाच खुद्द पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. नाशिक शिवसेनेकडेच राहील, असा दावा करीत, काही वेळातच मुख्यमंत्री नाशिकसाठी शिवसेनेचा उमेदवार घोषित करणार असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले. ( Nashik Lok Sabha Constituency to Shiv Sena )

महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण केल्यानंतर पालकमंत्री भुसे माध्यमांशी बोलत होते. पालकमंत्री भुसे म्हणाले, महाराष्ट्र दिनाला नाशिककरांना गोड बातमी मिळेल. नाशिक मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. म्हणून नाशिकसाठी आग्रही होतो. त्यानुसार नाशिक शिवसेनेचेच आहे. काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे नाशिकचा उमेदवार जाहीर करतील. संध्याकाळपर्यंत शिवसेनेचा उमेदवार मतदारापर्यंत पोहोचलेला असेल, असेही पालकमंत्री म्हणाले.

भुजबळ आमचे नेते

मंत्री छगन भुजबळ हे आमचे नेते आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही नाशिकची निवडणूक लढू आणि जिंकूही. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी आम्ही सर्व एकदिलाने काम करू असेही पालकमंत्री म्हणाले.(Nashik Political News)

शांतिगिरी महाराजांशी चर्चा नाही

लोकशाहीमध्ये कोणालाही फॉर्म भरण्याचा हक्क आहे. त्यानुसार ते फॉर्म भरतील.पण पक्षाचा एबी फार्म महत्वाचा असतो. त्यामुळे आमचा उमेदवाराच शिवसेनेचा असेल. उमेदवारी वा निवडणुकीबाबत स्वामी शांतिगिरी महाराज यांच्याशी कोणतीही चर्चा नाही. त्यांच्याशी भेटही नसल्याचे पालकमंत्री भुसे म्हणाले.

आम्ही सोबतच

13 खासदार आणि सर्व आमदार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सोबतच आहोत. राज्याच्या विकासासाठी आम्ही पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आहोत असेही पालकमंत्री म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT