khair wood esakal
नाशिक

नाशिक : खैर लाकडाची तस्करी करणारे गुजरात राज्यातील वाहन जप्त

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सुरगाणा व पेठ येथील जंगलातून खैर लाकडाची तस्करी करणाऱ्या वाहन जप्त करण्यात वनविभागाच्या पथकास यश आले आहे. वनविभागाने केलेल्या कारवाईत एक गुजरात राज्याची पासिंग असलेले वाहन आणि अवैधरीत्या तोडलेले खैर लाकूड जप्त केले आहे. सातत्याने या भागातून होत असलेली खैर लाकडाची तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान वनविभागापुढे समोर आहे. (Latest Marathi News)

सुरगाणा व पेठ येथील जंगलातून शेजारील गुजरात राज्यात मोठ्या खैर लाकडाची तस्करी होत असते. पळसन वनपरिक्षेत्रातील बोरपाडा वन परिमंडळांतर्गत असलेल्या वनक्षेत्रातून जीजे १५ झेड ४४७० या क्रमांकाच्या पिकअप गाडीतून तस्कर खैर लाकडे अवैधरीत्या वाहून नेणार असल्याची गोपनीय माहिती पळसन वनपथकाला मिळाली होती. त्यानुसार पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली बाऱ्हे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. कवर, फिरते पथकाचे अधिकारी सुरेश गवारी, पळसनचे वनपाल बी. सी. भोये, वनरक्षक टी. एच. खांडवी, खडकमाळचे वनरक्षक वाय. एस. गावित यांच्या पथकाने गुरुवारी (ता.१८) रात्री एक वाजेच्या सुमारास जंगलाच्या परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला.

यावेळी तस्करी करणाऱ्या संशयित यांना वनविभागाच्या आल्याची कुणकूण लागताच खैर तस्करांनी पळून जाण्यासाठी वाट बदलली. वनाधिकाऱ्यांनी देखील दुसऱ्या वाटेने गुजरातकडे जाणारी चोर वाट गाठली. बोरपाडा रस्त्यावरून जात असताना पथकाने वाहनाद्वारे त्या पिकअपचा पाठलाग केला. यावेळी तस्करांनी वाहून जागेवरच सोडून देत अंधाराचा फायदा घेत पळ काढला. यावेळी वनविभागाच्या पथकाने खैराचे वीस नग (घनमीटर ०.९०७) लाकूड हस्तगत केले. पिकअप चालकासह अज्ञात तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datia Bypoll BJP Crisis : भाजपने माजी गृहमंत्र्यांचे तिकीट कापले, नाराज कार्यकर्त्यांकडून शहरात जाळपोळ, महामार्ग रोखला; पोलिसांवरही दगडफेक

Rameshbhai Kacholia Passes Away : हजारो सामाजिक संस्थांचा आधारवड हरपला, रमेशभाई गुलाबचंद कचोलिया यांचे मुंबईत निधन

Solapur: मोफत वधू-वर सूचक सेवेतून 3 हजारांहून अधिक संसारांना नवी दिशा; इरण्णा पनशेट्टी यांचे समाजसेवेचे प्रेरणादायी कार्य

Fake ₹500 Notes Seized : जळगावात सिनेस्टाईल थरार! बैलगाडीला धडक देऊन पळणाऱ्या कारमधून 500 रुपयांच्या नकली नोटा अन् तलवारी जप्त; 24 बंडले आढळल्याने गूढ वाढले

Akola: बोगस बियाण्यांवरून कृषी अधिकाऱ्यांना कक्षात डांबले; संतापाचा उद्रेक; शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT