Gurumauli Annasaheb More  esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : संगतीचा परिणाम मनावर होतो! गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

Gurumauli Annasaheb More : प्रत्यक्ष विषय वासनेपेक्षा, विषयवासना असलेल्या माणसाची संगत फार वाईट असते, हे जसे संसारात तसेच परमार्थातही लागू पडते.

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : प्रत्यक्ष विषय वासनेपेक्षा, विषयवासना असलेल्या माणसाची संगत फार वाईट असते, हे जसे संसारात तसेच परमार्थातही लागू पडते. संगतीचा परिणाम मनावर होतो. म्हणून चांगल्या विचाराच्या माणसाची संगत धरावी. चांगले-वाईट हे नेहमी आपल्यावरूनच ओळखावे. आपण स्वत:ला सुधारण्याऐवजी जगाला सुधारायला जातो, हेच आपले चुकते. सद्‍गुरूंना ओळखायला आपल्या अंगी थोडेतरी श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल प्रेम असायला पाहिजे, असे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरी प्रधान केंद्रात रविवारी (ता. २१) सांगितले. ( Gurumauli Annasaheb More statements of Association affects mind )

दिंडोरी प्रणित प्रधान अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात रविवारी गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांशी संवाद साधला. गुरुमाउली म्हणाले, की सद्‍गुरू ज्या लीला करतात, त्या जगाच्या कल्याणासाठी असतात. सद्‍गुरू स्वस्थ बसलेले दिसले तरी ते जगाचे कल्याण करीत असतात. सद्‍गुरू आनंदरूप झालेले असल्याने त्यांच्या वचनानुसार आपण वागावे.

लोकांना उपदेश करण्यात त्यांचा एकच हेतू असा असतो, की जे मला कळले ते लोकांना कळून लोकांना समाधान मिळावे. प्रपंच हा दु:खमय आहे, हे कळल्यावर त्यावरील उपाय सद्‍गुरूंनी लिहिलेल्या ग्रंथाच्या वाचनाने कळतो. त्यामुळे ग्रंथात सांगितल्याप्रमाणे करावे. आपण ग्रंथात जे वाचतो ते आचरणात आणले नाही, तर त्या वाचनाचा उपयोग होत नाही. वाचनाचे मनन झाले पाहिजे. ज्यांचा ग्रंथ आपण वाचतो, त्यांच्या कृपेवाचून तो नीट समजणार नाही. (latest marathi news)

ज्याच्यावर त्यांची कृपा आहे, त्याला अंगी विद्वत्तता नसतानाही, त्या ग्रंथाबरोबर अर्थ सहजपणे कळेल. विद्वान हा कल्पनेने सत्यस्वरूपाचे वर्णन करतो, सद्‍गुरू मात्र निश्चयाने, खात्रीने, अनुभवाने ते रूप काय आहे ते सांगतात. सद्‍गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनविणे ही खरी सत्संगती आहे.

सुरवातीला सकाळी गुरुमाउलींच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची महापूजा झाली. त्यानंतर गुरुमाउलींनी सेवेकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रम झाला. स्वामी सेवेनंतर दुपारी गुरुमाउलींनी उपस्थित सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले. पालखी सोहळा होऊन सायंकाळी महाआरती झाली. या वेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी आबासाहेब मोरे व सेवेकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT