नाशिकमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट ‘आयटी हब'' क्षमता
नाशिकमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट ‘आयटी हब'' क्षमता  sakal
नाशिक

नाशिकमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट ‘आयटी हब'' क्षमता

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आडगाव शिवारात साकारण्यात येत असलेल्या महापालिकेच्या आयटी हबच्या माध्यमातून शहर विकासाला वेगळी दिशा मिळणार आहे. या माध्यमातून रोजगाराची मोठी संधी सुशिक्षितांना प्राप्त होणार असल्याचे मत महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त करताना पायाभूत सुविधा, हवामान व दळणवळणाची सुविधा लक्षात घेता देशातील सर्वोत्कृष्ट आयटी हब होण्याची क्षमता नाशिकमध्ये असल्याचे मत व्यक्त केले.

महापालिकेकडून आडगाव शिवारात शंभर एकर क्षेत्रामध्ये आयटी पार्क साकारण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. आयटी पार्कसाठी महापौर कुलकर्णी यांनी पुढाकार घेताना वेगाने सूत्रे हलविली. ठरावाच्या मंजुरीनंतर आयुक्त कैलास जाधव यांच्याशी चर्चा करून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला. सरकारने आयटी हब विशेष उद्देश वहन समिती अर्थात स्पेशल पर्पज व्हेईकल साठी (एसपीव्ही) स्थापन करण्यास मान्यता दिल्याने आयटी हबचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना महापौर कुलकर्णी म्हणाले, आयटी पार्कसाठी गेल्या सात ते आठ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. बाराशे आयटी क्षेत्राशी संबंधित तरुणांची वॉकेथॉन घेण्यात आली.

वॉकेथॉनमधून आयटी पार्क व्हावे, अशी जोरदार इच्छा व्यक्त करण्यात आली. त्या वेळीदेखील शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. महापौर पद स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून सोयी- सुविधा उपलब्ध करून देतानाच नाशिकच्या औद्योगिक विकासावर लक्ष केंद्रित केले. त्याचे फलित म्हणून केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी एसपीव्ही स्थापन करण्यास संमती दिल्याने शहर विकासाला यानिमित्ताने गती मिळणार आहे.

नावलौकिक वाढणार

नाशिक- मुंबई-पुणे या सुवर्ण त्रिकोणातील एक प्रमुख शहर म्हणून नाशिकचा नाव लौकिक आहे. उत्तर महाराष्ट्रातील ३२ टक्के आयटी क्षेत्रातील संबंधित हैदराबाद, बंगलोर, पुणे शहरांमध्ये नोकरीसाठी जातात. आयटी क्षेत्राशी संबंधित ज्ञान घेतलेले मनुष्यबळ व पायाभूत सुविधादेखील नाशिकमध्येच सहजरित्या उपलब्ध होईल, असे असताना सुद्धा आयटी हब या विषयाला चालना मिळाली नाही. परंतु, नाशिकमध्ये आयटी हब बनण्याची मोठी क्षमता आहे. आतापर्यंत राजकीय अनास्थेपायी आयटी हब झाले नाही. भाजपच्या सत्ताकाळात महापालिकेने पुढाकार घेत राज्यात आदर्श निर्माण केला.

"कुंभमेळ्यासाठी देश-परदेशातून नागरिक येतात आयटी हब विकसित होत असल्याने नाशिकची मंत्र भूमिकडून तंत्र भूमिकडे वाटचाल सुकर होईल."

- सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

IPL 2024 : लाजिरवाण्या पराभवासह मुंबई इंडियन्सचा प्रवास थांबला; पांड्या म्हणाला, फक्त हा सामनाच नव्हे तर...

Share Market Today: शेअर बाजाराच्या विशेष सत्रात आज कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

SCROLL FOR NEXT