Sanjay-Raut sakal
नाशिक

नाशिक : पुन्हा युतीचे राज्य आले का?

शिवसेनेचे प्रभाग २८ चे नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्या विकासकामांचे उद्‌घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते शनिवारी (ता. २०) होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिवसेना किंवा शासनाच्या कुठल्याही निर्णयावर भारतीय जनता पक्षाकडून टीका झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाची ढाल म्हणून पुढे होत भाजपच्या उत्तराला प्रत्युत्तर देत गारद करणारे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पत्रिकेवरील ज्या तीन कार्यक्रमांसाठी ते येत आहेत, त्यातील दोन कार्यक्रम भाजपचेच असल्याने पुन्हा युतीचे राज्य आले का, अशी खुमासदार चर्चा शहरात सुरू आहे.

शिवसेनेचे प्रभाग २८ चे नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्या विकासकामांचे उद्‌घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते शनिवारी (ता. २०) होत आहे. त्यानंतर भाजपचे नगरसेवक व ‘निमा’चे माजी अध्यक्ष शशिकांत जाधव यांच्या वॉटर पार्कमध्ये होणाऱ्या फ्लॉवर पार्कचे उद्‌घाटनही सकाळी अकराला होईल. मध्य विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या विवाहाला खासदार राऊत उपस्थित राहून वदू-वरांना आशीर्वाद देतील. जाधव भाजपचे असले, तरी शिवसेनेच्या राऊत यांच्या हस्ते फ्लॉवर पार्कचे उद्‌घाटन होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले होते. विवाहानिमित्त भाजपचे प्रदेश पातळीवरील नेत्यांची मांदियाळी असताना जाधव यांनी खासदार राऊत यांच्या हस्ते उद्‌घाटन आयोजित केल्याने राष्ट्रवादी किंवा शिवसेना या दोन पक्षांमध्ये ते प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : भारतीय वायुसेनेतील जवानांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश; पूर्वपरवानगीशिवाय सेवा सोडता येणार नाही

Koyna Reservoir Renamed : आता कोयना धरण 'छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' नावाने ओळखले जाणार; शासनाचा ऐतिहासिक निर्णय, पाहा काय आहे GR?

Malin Landslide: माळीण दुर्घटनेला १२ वर्षे! १५१ जणांना गिळणाऱ्या काळरात्रीची वेदना आजही कायम, दरडीत गाडले गेले संपूर्ण गाव

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याचा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली अन् ...

ED Raid Coal Mafia : देशातील मोठ्या कोळसा माफियावर ईडीची छापेमारी; ६०० कोटींची मालमत्ता, १६० कोटींचा म्युच्युअल फंड गोठवला

SCROLL FOR NEXT