A cow eating a plastic bag from the garbage. esakal
नाशिक

Nashik News : कचऱ्यातील प्लॅस्टिकमुळे गाईंचे आरोग्य धोक्यात

Nashik : परिसरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असून रस्त्यावर फिरणाऱ्या गाई कचऱ्यासोबत प्लास्टिकच्या पिशव्यांचेही सेवन करतात.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : परिसरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असून रस्त्यावर फिरणाऱ्या गाई कचऱ्यासोबत प्लास्टिकच्या पिशव्यांचेही सेवन करतात. यामुळे गाईंचे आरोग्य धोक्यात आले आहे. अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम, २००६ नुसार सरकारने महाराष्ट्रमध्ये प्लॅस्टिकचे उत्पादन, वापर, विक्री, साठवण, तसेच थर्माकोल इत्यादींच्या वापरावर पूर्ण बंदी घातली आहे. (Nashik Health of cows in danger due to plastic in waste marathi News )

सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, प्लॅस्टिकपासून बनलेल्या ज्या वस्तूंचे विघटन होत नाही, अशा वस्तू वापरण्यास मनाई केली आहे. परंतु पंचवटी परिसरातील दिंडोरी रोडवरील चित्रकूट समोरील बाजूस, मायको दवाखाना समोरील बाजूस पादचारी मार्ग, अवधूत वाडी समोरील बाजूस पादचारी मार्ग, तसेच विद्युत नगर संरक्षण भिंतीलगत, पेठ रोडवरील पाटावर नेहमीच कचरा व त्यात प्लास्टिकच्या पिशव्या असतात.

दिंडोरी, पेठ रोड परिसरात रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गाई या ठिकाणी कचऱ्यात अन्न शोधत त्याचे सेवन करतात. मात्र, त्यावेळी अन्नाऐवजी प्लास्टिकच्या पिशव्याच त्यांच्या पोटात जाऊन त्याचा गोळा तयार होतो. यामुळे गाईंचे व गुरा-ढोरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कठोर भूमिका घेणे गरजेचे

कचरा उघड्यावर टाकणे अद्याप बंद झालेले नाही, त्यातच प्लास्टिकचा वापरही सुरूच आहे. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याशी खेळ होत असून, पोटातील आतड्यांच्या हालचाली प्लॅस्टिकसेवनामुळे मंदावत आहेत. त्यामुळे प्रशासनाने उघड्यावरील कचरा आणि प्लॅस्टिकबंदीबाबत अधिक कठोर भूमिका घेणे गरजेचे बनले आहे.

प्लास्टिकचा गोळा गायींच्या पोटात तयार झाल्याने पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो. तब्येत कमी होते. पोटफुगीची शक्यता असते. प्लॅस्टिकमुळे आजारी पडणाऱ्या जनावरांमध्ये गायींचे प्रमाण अधिक आहे. शहरातून प्लॅस्टिकची, तर ग्रामीण भागातून खिळे, तार, प्लास्टिकच्या धाग्यांची समस्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT