Heavy rain continues in Igatpuri  esakal
नाशिक

Nashik Monsoon Season : इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर कायम; 24 तासांत पुन्हा 93 मिलिमीटरची विक्रमी बरसात

Nashik News : इगतपुरी तालुक्यात सलग आठ दिवसांपासून संततधारेसह मुसळधार कोसळत असून, त्यात पावसाचा जोर अधिकच वाढल्याने विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : इगतपुरी तालुक्यात सलग आठ दिवसांपासून संततधारेसह मुसळधार कोसळत असून, त्यात पावसाचा जोर अधिकच वाढल्याने विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे शुक्रवारी (ता. २६) पुन्हा दारणा, वाकी, भाम या नद्या अधिक जोराने प्रवाहित झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. इगतपुरी तालुक्यात २४ तासांत पुन्हा विक्रमी ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. (Heavy rain continues in Igatpuri taluka)

घोटी, इगतपुरीत सर्वाधिक पाऊस झाला असून, दोन्ही शहरांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. सलग होणाऱ्या मुसळधारेमुळे भावली व भाम धरण १०० टक्के भरले असून, दारणा धरणांसह तालुक्यातील धरणांमध्ये साठा वेगाने वाढत आहे. इगतपुरी तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच भात शेतामध्ये शुक्रवारी तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे.

पूर्व भागात झालेल्या जास्त पावसामुळे भातलागवडीच्या कामांना ‘ब्रेक’ लागला आहे. दारणा, भाम व वाकी या नद्या या मोसमात सलग सहा-सात दिवसांपासून दुथडी वाहत आहेत. इगतपुरी, घोटी, मानवेढे, वैतरणा, धारगाव, टाकेद या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. (latest marathi news)

या भागात आठ दिवसांपासून पावसाचे सातत्य कायम राहिले आहे. मात्र रात्रभराचा पाऊस हा अतिवृष्टीसदृश होता. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.

दरम्यान, घोटी, इगतपुरी व परिसरात मुसळधार पाऊस झाला असून, संततधारेमुळे शहरी तसेच ग्रामीण भागात पूर्णपणे जनजीवन विस्कळित झाले आहे. हा पाऊस रात्रीपासून आज उशिरापर्यंत सुरूच राहिल्याने याचा थेट परिणाम जनजीवनावर झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : स्कूलबसचालकाने भर रस्त्यात केली टेम्पोची तोडफोड, पुणे पोलिसांनी शिकवला कायमचा धडा; गुडघ्यावर बसवत काढली धिंड, पाहा VIDEO

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी १०० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेताच भडकला चीन, जागतिक मंदीची शक्यता

Ladki Bahin Yojana: ‘ई-केवायसी’साठी लाडक्या बहिणींची डोकेदुखी; संकेतस्थळ चालेना, केवायसी न केल्यास लाभ होणार बंद

Multigrain Vs Wheat Flour: मल्टीग्रेन कि गव्हाचे पीठ? आरोग्यासाठी काय आहे, उत्तम वाचा एक्सपर्टचे मत

Sangli Fake Currency Racket : पोलिस हवालदारानेच चहाच्या दुकानात छापल्या १ कोटींच्या बनावट नोटा; सांगली, कोल्हापूरमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT