Heavy Rain Damage esakal
नाशिक

Nashik Rain Damage: कंरजाडी खोऱ्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; अनेक घरांचे पत्रे उडाले; कांदाही भिजला, वीजेचे खांब जमीनदोस्त

Nashik News : वादळात अनेक घरांचे पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूकही ठप्प झाली आहे.

- दीपक खैरनार

अंबासन, (जि.नाशिक) : करंजाडी खो-यात सायंकाळी सहाच्या सुमारास वीजेच्या कडकडाटसह वादळी वारा व पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळात अनेक घरांचे पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूकही ठप्प झाली आहे. शेतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चाळीचे पत्रे उडाल्याने साठवलेला कांदा भिजून पडला आहे. वादळाचा तडाखा वीजेच्या खांबानांही बसला असून बरेचशे जमीनदोस्त झाले आहेत.  (Nashik Heavy rain with force winds in Karanjade Valley)

पावसाळ्यातील पहिल्याच दिवशी करंजाडी खोऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाने धडक दिली. करंजाड (ता.बागलाण) येथे वादळामुळे अनेक घरांचे पत्रे उडाल्याने संसार उघडय़ावर पडला आहे. गावातील केदा कृष्णा देवरे यांच्या घराशेजारीच दावणीला बांधलेल्या शेळ्यावर भिंत कोसळल्याने मृत पावल्या आहेत.

वादळात उडालेले पत्रे अक्षरशः रस्त्यावर पडलेले दिसून येत होते. कांद्याला भाव मिळेल या भाबड्या आशेने शेतकऱ्यांनी शेतातील कांदा साठवणूक केलेल्या चाळीचे पत्रे उडाल्याने कांदा भिजून पडला आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान वीज वितरण कंपनीचे खांबही जमीनदोस्त झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. पोलिस पाटील प्रविण देवरे, सामाजिक कार्यकर्ते केवळ देवरे व इतर तरूणांनी मदतकार्य सुरू केले मात्र नुकसान मोठ्या प्रमाणात असल्याने अडचण निर्माण होत होती. वादळात रस्त्यावर अनेक झाडे उन्मळून पडल्याने करंजाडहून निताणे, पारनेर, बिजोटे, आनंदपुर, आखतवाडे, आसखेडा, नामपूर या गावांचा संपर्क तुटला असून रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. (latest marathi news)

रस्त्याच्या कडेला असलेली मोठी झाडे संबधित विभागाने पावसापूर्वी तोडणे आवश्यक असतांनाही नाहक वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे संबधित विभागाने लक्ष घालावे अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे तसेच नुकसान झालेल्या घरांचे व कांदा चाळीचे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करंजाड येथील नागरिकांनी केली आहे.

अन् डोळ्यात अश्रूधारा 

...वादळी वाऱ्यात झालेल्या नुकसानीचे चित्र पाहताच कष्टकरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते. भर उन्हाळ्यात तोकड्या पाण्यावर मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा पावसात भिजला, वादळात चाळीचे पत्रे उडाले तर मोठ्या कांदा चाळी जमीनदोस्त झाल्या साठवलेला कांदाचा चिखल झाला. दाद मागणार कुणाकडे अशा हताशपणे भिजलेल्या कांद्याकडे बघत होते तर बऱ्याशा घरांचे पत्रे उडाल्याने संसार उघडय़ावर पडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Property Tax: पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; बनावट नोंदी करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार, पुण्यात ३४ हजार मिळकतींची सखोल तपासणी हाेणार!

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाची नवी अधिसूचना जारी; कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील १०९ गावांतून जाणार, भूसंपादन होणारी तालुकावार गावे

New Gas Connection Rule: अचानक बदलले नियम; आता एक चूक अन् सिलिंडर बंद, सरकारच्या नव्या नियमामुळे लाखो कुटुंबं टेन्शनमध्ये!

Latest Marathi News Live Update : राज्यात एकूण ४०२ कॉपीचे प्रकार

Shiv Sena Politics: शिवसेनेत मोठा निर्णय! अहिल्यानगर शिवसेना जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; उदय सामंतांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

SCROLL FOR NEXT