Helmet Compulsion Drive by Police in Nashik City esakal
नाशिक

Nashik Helmet Drive : वाहनचालकांची कारवाईच्या भीतीने पळापळ; 3 दिवसात 7 लाखांचा दंड वसुल!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहर आयुक्तालय हद्दीमध्ये तीन दिवसांपासून हेल्मेटसक्तीची कारवाई सुरू आहे. त्याअंतर्गत दीड हजार विनाहेल्मेट दुचाकी चालकांना दंडाचा फटका बसला आहे. आयुक्तांकडून जाहीर होणाऱ्या कारवाईच्या पॉइंटनंतरही सुमारे चारशेपेक्षा अधिक विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई होते आहे. तर अनेकांची कारवाईची पॉइंटवरून पळापळ होतानाचे चित्र पहावयास मिळते आहे. पोलिसांच्या या कारवाईचा अनेकांचा मनस्ताप होत असला तरी, हेल्मेटचा वापर करणे गरजेचे असल्याबाबत पोलिसांकडून समुपदेशनही केले जात आहे. (Nashik Helmet compulsion Drive 7 lakh fine in 3 days Nashik news)

आयुक्तालयाकडून दररोज होणाऱ्या हेल्मेट तपासणी नाकाबंदीची माहिती सकाळी ट्विट करून दिली जाते. त्यानुसार शनिवारी (ता. ३) जत्रा हॉटेल, रासबिहारी चौक, प्रसाद सर्कल, मॅरेथॉन चौक, साईनाथनगर, कलानगर, दसक पूल, जेल रोड पाण्याची टाकी या ठिकाणी नाकाबंदी करून सकाळी ११ ते १२ आणि दुपारी साडेचार ते साडेसहा या दरम्यान हेल्मेटसक्ती मोहीम राबविण्यात आली. या वेळी नाकाबंदीच्या ठिकाणी स्थानिक पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

शनिवारी केलेल्या तपासणी मोहिमेत ४२८ विनाहेल्मेट दुचाकीस्वार अडकले. त्यांच्याकडून २ लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तर गेल्या तीन दिवसांमध्ये वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईत १ हजार ४२५ विनाहेल्मेट दुचाकीचालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला गेला. यातून ७ लाख २ हजार रुपयांचा दंडही वसूल झाला. मात्र या कारवाईतून अनेक दुचाकीचालकांना मनस्ताप सहन करावा लागला असला तरी, हेल्मेट वापरण्याबाबत पोलिसांकडून समुपदेशन करण्यात येत आहे.

पळ काढणाऱ्या चालकांचे छायाचित्र

दररोज वेगवेगळ्या चौकांमध्ये वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्तीची कारवाई होते आहे. त्यामुळे दुचाकीचालकांना प्रवास करताना अचानक नाकाबंदी दिसल्यानंतर ते पाठीमागे वाहन वळवून नेतात. तर काही जण पोलिसांना न जुमानता नाकाबंदीतून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. अपघात होऊ नये म्हणून पोलिसही दुरून रोखण्याचा प्रयत्न करतात. काही दुचाकीस्वार थांबतात तर काही जण मात्र पळ काढण्याच्या प्रयत्नात अपघाताची शक्यता असते. त्यामुळे पोलिस त्यांच्याकडील इ-चलनाचा वापर करून अशा पळ काढणाऱ्या चालकांचे छायाचित्र काढून कारवाई करीत आहेत.

हेही वाचा : दिव्यांग खेळाडूंची खडतर 'पाठशाळा'

अशीही बनवाबनवी

हेल्मेटसक्ती कारवाईदरम्यान ठिकठिकाणी नाकाबंदी करीत विनाहेल्मेट दुचाकीस्वारावर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली. अनेक ठिकाणी दुचाकीस्वाराला रोखल्यानंतर त्याची दंड भरण्यास नकारघंटाच असते. त्यात वेळ खर्ची जात असताना पोलिसांकडून अन्य दुचाकीस्वारावर कारवाई सुरू होते. या संधीचा लाभ घेत अनेकांनी चोर पावलाने काढता पाय घेतला. तर, काहीजण हेल्मेटमुळे सुटका झालेल्या दुचाकीस्वारांचे हेल्मेट घेऊन येऊन सुटका करून घेत पोलिसांची बनवाबनवी करीत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. 

तीन दिवसातील कारवाई

तारीख कारवाई दंड
१ डिसेंबर ५५४ २ लाख ७७ हजार रुपये
२ डिसेंबर ४४३ २ लाख २५ हजार रुपये
३ डिसेंबर ४२८ २ लाख रुपये
एकूण १४२५ ७ लाख २ हजार रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT