Suhas Barskar esakal
नाशिक

Nashik Highway Accident : माझी पत्नी व मुलगी कुठे आहेत, दाखवा ना!

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : ‘माझी पत्नी व मुलगी कुठे आहेत, दाखवा ना! मला तिथे घेऊन चला ना... कुठे आहे...’, असे उद्‌गार होते पाथरे येथील अपघातात जखमी झालेल्या एका पित्याचे. या पित्याचे नाव आहे सुहास बारस्कर. अपघातानंतर सुहास हे बेशुद्धावस्थेत होते.

त्यांच्यावर आणि त्यांच्या चिमुकल्या शिवन्या या कन्येवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुद्ध आल्यावर सुहास यांनी डॉक्टरांना जो प्रश्‍न विचारला त्यामुळे सर्वांच्याच भावना हळहळल्या.

शुद्ध आल्यावर सर्वप्रथम त्यांनी डॉक्टरांना विचारले, ‘माझी पत्नी आणि मुलगी कुठे आहे? या वेळी सर्वांनाच काय सांगावे असा प्रश्‍न पडला. डॉक्टरांनी, ‘तुमचे कुटुंब हे उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात आहे’, असे सांगितले. तरीही सुहास यांनी भेटण्याचा हट्ट धरला होता. (Nashik Highway Accident Dad and Husband Suhas Bhaskar asked question to doctor after he wake after accident and tretment Nashik News)

मात्र नेमके तिकडे गेल्यावर आपल्याला काय पाहावयास मिळेल याची पुसटीशीही कल्पना सुहास यांना नव्हती. अपघातातील मृतांमध्ये त्यांची पत्नी श्रद्धा सुहास बारस्कर (वय ३५), श्रावणी सुहास बारस्कर (वय ९) यांचीही नावे होती. मृतांची ओळख पटविण्यासाठी सुहास यांना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात आणण्यात आले.

रात्री जे आपल्यासोबत होते त्या पत्नी आणि मुलीचा मृतदेह पाहून सुहासने जिवाच्या आकांताने हंबरडा फोडला. शासकीय अधिकारीही भावनाविवश झाले होते. अपघातातील मृतांची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांना शासकीय रुग्णालयात आणण्यात आले.

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

चांदणी निर्मल गच्छे हिच्या वडिलांना ज्या वेळी शासकीय रुग्णालयात आणण्यात आले त्या वेळी आपल्या मुलीला स्ट्रेचरवर बघताच त्यांच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अंशुमन बाबू महंती या चिमुकल्याचा अपघातात मृत्यू झाल्याने त्याच्या आई-वडिलांच्या अश्रुधारा कोसळत होत्या. त्याची आई रुग्णालयात ‘माझा बाबू, अंशुमन कुठे आहे?’

असा जिवाचा आक्रोश करीत होती. अंशुमन या चिमुकल्याच्या बहिणीवर बालरुग्णालयात, तर वडील यांच्यावरही एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या आईचा सतत आकांत पाहून अनेकांना अश्रू अनावर झालेले होते. अशी वेळ कोणावरही कधी येऊ नये, अशी प्रार्थना सर्वजण देवाजवळ करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल समुद्रात दहशत! जीव वाचवण्यासाठी जहाजांच्या रडारवर मुस्लिम असल्याचे मेसेज; धर्म विचारुन केलं जातंय लक्ष्य

Amazon Prime Day Sale: आला रे आला अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ आला; मध्यरात्रीच सुरू होतोय धडका, मोठी संधी चुकवू नका!

Latest Marathi News Updates: पुणे स्लीपर सेल मॉड्युल प्रकरणी अकरावी अटक

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

SCROLL FOR NEXT