Toll Message
Toll Message esakal
नाशिक

Nashik News : पुन्हा एकदा ‘टोलचा झोल’ उघड! वाहन घरीच, तरी मोबाईलवर टोलपावती; त्र्यंबकेश्वरच्या ग्राहकाची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : चारचाकी गाडी घरीच उभी केलेली असताना मुंबई-आग्रा महामार्गावरील पडघा टोलनाक्याच्या नावाने टोलपावती निघाल्याचा मेसेज मोबाईलवर प्राप्त झाला. बुधवारी (ता. २८) सकाळी सातला हा प्रकार घडला. गाडी घरासमोरच असताना परस्पर टोल फाडल्याने ‘टोलचा झोल’ पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. (Nashik toll receipt Problem marathi news)

त्र्यंबकेश्वर येथील बाबूराव उगले यांची चारचाकी (एमएच १५ जेएम ६३१८) घरासमोरच उभी असताना बुधवारी (ता. २८) सकाळी सातला मुंबई-आग्रा महामार्गावरील अर्जुनअली (पडघा) टोलनाक्यावर १४० रुपये कापल्याचा मेसेज त्यांना मोबाईलवर प्राप्त झाला.

या मेसेजच्या पडताळणीसाठी श्री. उगले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांना १०३३ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्यास सांगण्यात आले. या क्रमांकावर संपर्क केला असता त्यांनी तक्रार नोंदवूनच घेतली नाही. (Latest Marathi News)

बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. बँकेशी संपर्क केला, तर कुणीच फोन उचलत नसल्याचा अनुभव त्यांना आला. त्यामुळे त्यांनी थेट केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांना हीच प्रक्रिया सांगण्यात आली. पण ग्राहकाचा प्रश्न काही सुटला नाही. या प्रकरणावरून टोलचा झोल पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.

"टोल नाक्यावर न जाताच १४० रुपये बँक खात्यातून कपात झाल्याचा मेसेज प्राप्त झाला. याची तक्रार व खातरजमा करण्यासाठी अनेक ठिकाणी दूरध्वनी केला. पण पदरी निराशा पडली. हा फक्त १४० रुपयांचा विषय नसून, अशा पद्धतीने ग्राहकांची फसवणूक होणे योग्य नाही."

- बाबूराव उगले, तक्रारदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT