Water facility for animals made by a farmer in Khamkheda. esakal
नाशिक

Nashik Humanity News: भीषण दुष्काळातही वाहतोय माणुसकीचा झरा! खामखेड्याच्या शेतकऱ्याकडून 300 जनावरांसाठी पाण्याची सुविधा

Water Crisis : गिरणा नदीकाठावरील अनेक गावांना मागील अनेक वर्षांच्या तुलनेत यंदाचा दुष्काळ अत्यंत भयावह आहे

सकाळ वृत्तसेवा

खामखेडा : गिरणा नदीकाठावरील अनेक गावांना मागील अनेक वर्षांच्या तुलनेत यंदाचा दुष्काळ अत्यंत भयावह आहे. गिरणा नदीकाठावरील गावांमधील पाळीव जनावरांना देखील चारा व पाण्याचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात भेडसावत असताना खामखेडा गावातील कसाड शिवारातील शेतकरी, पशुपालक निंबा पुंडलिक पवार यांनी गाव व परिसरातील काठेवाडी पशुपालकांच्या ३०० हुन अधिक मुक्या जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून दिले आहे. ‘दुष्काळातही माणुसकीचा झरा वाहतोय’ अशीच प्रचिती यामुळे येत आहे. (Nashik Water facility for animals Khamkheda farmer marathi news)

खामखेडा शिवारातील काळखडी डोंगराच्या पायथ्याशी ३०० गाई व म्हशींसाठी सकाळ व सायंकाळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल, अशा टाक्यांची सोय निंबा पवार यांनी केली आहे. या वस्तीपासूनच नदीकाठावरून मळ्यात गेलेल्या पाईपलायनीद्वारे त्यांनी दररोज ह्या टाक्या सतत पाण्याने भरलेल्या राहतील, अशी व्यवस्था केलेली आहे.

यंदाच्या तप्त उन्हाने मुक्या जनावरांची पाण्यासाठी लाहीलाही होत आहे.शेतकऱ्यांच्या विहिरी दिवसेंदिवस कोरड्या होत असताना पवार हे मुक्या जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपुढे त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे.

निंबा पवार प्रगतिशील शेतकरी असून, पशुपालकदेखील आहेत. पंधरा वर्षांपासून ते परप्रांतीय काठेवाडी बांधवांच्या ३०० हुन अधिकच्या पशुधनाला मुबलक पाणीपुरवठा करतात. काठेवाडी बांधवांकडून कुठलाही मोबदला न घेता ते जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देत आहेत. . (latest marathi news)

यंदाच्या भीषण दुष्काळात गिरणा नदीला तीन महिन्यांनी आवर्तन मिळू लागले आहे. सध्या गिरणाचे आवर्तन बंद झाल्याने बेज भादवनपासून ते निंबोळ्यापर्यंत गिरणा नदी कोरडीठाक आहे. त्यामुळे या भागातील मेंढपाळांना देखील पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. असे असतानाही पवार यांनी जनावरांसाठी दुष्काळातही पाणी उपलब्ध करून दिले आहे.

"आम्ही काठेवाडी बांधव मागील २५ ते ३० वर्षांपासून खामखेडा गावच्या काळखडी डोंगराच्या पायथ्याशी राहतो. पशुपालन व्यवसायात आमची दुसरी पिढी आहे. पूर्वी पावसाळा चांगला होता. पाण्याची कमतरता भासत नव्हती. पाच वर्षापासून उन्हाळ्यात चारा व पाण्याचा प्रश्‍न भेडसावतो. निंबा पवार यांनी जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून दिल्याने दिलासा मिळाला आहे."

- रामा गमारा, काठेवाडी, पशुपालक, खामखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT