Vaishali Pawar and Arjun Pawar esakal
नाशिक

Nashik News : पत्नीचा खून करीत, पतीने उचलले टोकाचे पाऊल

Nashik : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार करून पतीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कुकूडणे येथील देशमुखनगरमध्ये बुधवारी (ता. १७) घडली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार करून पतीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कुकूडणे येथील देशमुखनगरमध्ये बुधवारी (ता. १७) घडली. गुरुवारी (ता. १८) दोघांचेही मृतदेह मूळगावी गुजरातमध्ये पाठविण्यात आले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उंबरठाण पोलिस दूरक्षेत्र हद्दीतील कुकूडणेपैकी देशमुखनगर सीमावर्ती भागात वैशाली अर्जुन पवार (वय २५) व अर्जुन श्‍यामल पवार (२५, रा. बिशोनिया, ता. व्यारा, जि. तापी, गुजरात, हल्ली मु. देशमुखनगर, कुकूडणे) हे पती-पत्नी शेतात राहत होते. (Nashik Husband took extreme step of killing his wife)

चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये नेहमीच भांडणे होत. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पती अर्जुन याने पत्नी वैशाली घरात असताना तिचा गळा दाबून ठार केले. दरम्यान, आपल्या हातून गैरकृत्य घडल्याचे लक्षात येताच अर्जुनने वनपट्ट्यातील एका सादड्याच्या झाडाला ओढणी व दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलिसपाटील मनोहर चौधरी यांनी पोलिसांना दिली.

सोमनाथ कोदे यांच्या तक्रारीवरून मृत संशयित आरोपी पती अर्जुन पवारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या मागे एकुलता सहा वर्षांचा मुलगा आहे. दोघांचे मृतदेह विच्छेदनासाठी सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यानंतर गुजरातमधील बिशोनिया गावी दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुजीत पाटील अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : पहिल्या तुकडीतील एकूण अग्निवीरांपैकी ७५% अग्निवीर सशस्त्र दलांमधील आपला ४ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT