women and child development department  esakal
नाशिक

Nashik News: सापडलेल्या बालकांची ओळख पटवा; महिला बालविकास अधिकारी दुसाने यांचे आवाहन

Nashik News : महिला व बालकल्याण समितीतर्फे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत बालगृहात काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके दाखल केली जातात.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महिला व बालकल्याण समितीतर्फे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत बालगृहात काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके दाखल केली जातात. या बालकांची ओळख पटवून संपर्क साधण्याचे आवाहन महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने यांनी केले आहे. (Nashik Identify found children Appeal of Women Child Development marathi news)

सापडलेल्या बालकांचा तपशील असा : कु. आशीष (वय ८ दिवस) हा बालक ४ जानेवारीला दुपारी तीनला बखारीचा पाडा, मोखाडा पोलिस ठाणे (ता. मोखाडा, जि. पालघर) हद्दीत विनापालक आढळल्याने त्याला पालघर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्याला ५ जानेवारीपासून नाशिकला आधाराश्रम संस्थेत दाखल केले आहे.

कु. अनघा (वय १ महिना) ही बालिका एक दिवसाची असताना २६ नोव्हेंबरला सकाळी साडेसातला बोधलेनगरला सिग्नलजवळ बेवारस आढळून आली. तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तिला १९ डिसेंबरपासून अनघा नाव देण्यात येऊन नाशिकला आधाराश्रमात दाखल करण्यात आले. (Latest Marathi News)

कु. श्रेयस हा १० ते १२ दिवसांचा बालक १४ जानेवारीला मालेगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री साडेआठच्या सुमारास दसाणे गावातील पडीक शेतात विनापालक आढळला. या बालकाला मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल करून त्यानंतर १९ जानेवारीपासून बालकल्याण समितीच्या आदेशानुसार श्रेयस नाव देण्यात येऊन नाशिकला आधाराश्रमात दाखल केले आहे.

या तिन्ही बालकांच्या भविष्याचा विचार करता आशीष, अनघा व श्रेयस यांच्या पालकांनी घारपुरे घाट येथील आधाराश्रम संस्थेत ०२५३-२५८०३०९ किंवा २९५०३०९ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बालसंरक्षण कक्ष नाशिक, समाजकल्याण आवार, नाशिक-पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक ०२५३- २२३६३६८ या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT