अनधिकृत गॅस भरणा अड्ड्यावर पोलिसांचा छापा Sakal
नाशिक

नाशिक : अनधिकृत गॅस भरणा अड्ड्यावर पोलिसांचा छापा

अनधिकृतरीत्या वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणा करणाऱ्या अड्ड्यावर भद्रकाली पोलिसांनी छापा मारला.

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : अनधिकृतरीत्या वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणा करणाऱ्या अड्ड्यावर भद्रकाली पोलिसांनी छापा मारला. गॅस भरणा करण्यासाठी वापरण्यात येणारे दोन यंत्र, रिकाम्या गॅस सिलिंडर टाक्या आणि एक रिक्षा, असा सुमारे १ लाख ७० हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला.

तिगरानिय रोड परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये वाहनांमध्ये अनधिकृतरीत्या घरगुती गॅस भरणा करून देण्याचे काम सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी निंबाळकर यांना मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक डी. वाय. पवार यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यांनी धान्य वितरण अधिकारी अनिता खैरनार यांना संबंधित कारवाई करण्यासंदर्भात पत्र दिले. श्री. पवार, श्रीमती. खैरनार, पोलिस कर्मचारी उत्तम पाटील, श्री. जगदाळे, श्री. राठोड यांनी प्रत्यक्ष खात्री करत छापा मारला.

त्याठिकाणी संशयित साहिल बिलाल पठाण ( २४, रा. अमरधाम रोड) रिक्षामध्ये (एमएच- १५- एफयु- ०७०९) अनधिकृतरीत्या घरगुती गॅस भरणा करताना आढळून आला. त्यास ताब्यात घेण्यात आले. चौकशी केली असता गुलाम आयुब पठाण याचा अड्डा असल्याचे सांगितले. दरम्यान, पठाण घटनास्थळी हजर झाला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून दोन इलेक्ट्रिक यंत्र, २१ भरलेल्या गॅस सिलिंडर टाक्या, १ अर्धवट भरलेली गॅस टाकी, १० रिकाम्या गॅस सिलिंडरच्या टाक्या, २ वजन काटे आणि एक गॅस भरण्यासाठी आलेली रिक्षा, असा १ लाख ७० हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस नाईक उत्तम पाटील यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दोघा संशयितांना बुधवारी (ता.२४) दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Hockey Player : अवघ्या २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूने घेतला गळफास, उपचारासाठी प्रयत्न केले पण...

अंकिता वालावलकरच्या आंब्याच्या पेट्या चोरीला; यूपीच्या कुरिअरवाल्याने पळवलं सामान; इतक्या हजारांचं नुकसान

Latest Marathi News Live Update : श्री संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची शिकार प्रकरण उघड; 6 आरोपी ताब्यात

Pimpri Chinchwad News : महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमुळे रुग्णांना कमी खर्चात मिळतात उत्तम उपचार

Pakistan Lockdown: आज रात्रीपासून पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन! पंतप्रधान शहबाज शरीफ यांची घोषणा

SCROLL FOR NEXT